तमिळ सुपरस्टार थलपती विजयचा गेल्या काही दिवसांपासून 'लिओ' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली. आता अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
'लिओ' चित्रपटाच्या २ मिनिटे ४३ सेकंदाच्या ट्रेलरची कथा ही लिओ भोवती फिरताना दिसते. त्याचा भूतकाळ सतत त्याच्या समोर येत असतो. त्याची मुलगी आणि पत्नी हे त्याचे सर्व काही असतात. मात्र एका अपघातात तो पत्नीला गमावते. त्यानंतर लिओला अनेकदा गुंडांशी चार हात करताना दाखवले आहे. चित्रपटात काही जंगली प्राण्यांचे सीन्ससुद्धा व्हीएफएक्सच्या माध्यमातून हुबेहूब सादर करण्यात आल्याचे ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे. तसेच संजय दत्तची एण्ट्री सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एकंदरीत चित्रपटात अॅक्शन, स्टंट्स, आणि डायलॉगबाजी पाहायला मिळते. ‘जवान’फेम अनिरुद्ध रवीचंदरचं पार्श्वसंगीत खिळवून ठेवणारे आहे.
वाचा:धक्कादायक! रणबीरसोबतच १७ बॉलिवूड कलाकार व १०० इंफ्लुएंसर ईडीच्या रडारावर
'लिओ' हा हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला असला तरी अद्याप याचा हिंदी ट्रेलर समोर आलेला नाही. ‘लिओ’च्या फर्स्ट लुकमध्ये थलपती विजय ज्या डॅशिंग अवतरात दिसला होता तसाच त्याचा हा दमदार लुक चाहत्यांना जबरदस्त आवडला आहे. तसेच हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या