दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेता म्हणून थलपती विजय ओळखला जातो. आज १९ ऑक्टोबर रोजी त्याचा 'लिओ' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. आता या चित्रपटाची कथा काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
लिओ या चित्रपटात हिमाचलमध्ये राहणाऱ्या पार्थीबन नावाच्या मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. पार्थीबनचे लग्न झालेले असते. त्याला दोन मुले असतात आणि तो एक कॅफे चालवत असतो. अत्यंत साधारण आयुष्य तो जगत असतो. मात्र जेव्हा गावकऱ्यांवर संकट येते तेव्हा स्वत:च्या जीवाची बाजी लावून तो सर्वांचा जीव वाचवतो. त्यानंतर पार्थीबन हा साधारण मुलगा नसल्याचे सर्वांना कळते. त्यानंतर चित्रपटात अभिनेता संजय दत्तच्या लिओ या पात्राची एण्ट्री होते. या पात्राचा एक वेगळाच इतिहास असतो.'लियो'नक्की कोण आहे? या सिनेमाचं कथानक नक्की काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे.
वाचा: ४० हजार रुपयांच्या प्रश्नासाठी स्पर्धकाने वापरल्या ३ लाइफलाइन, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?
लिओ इतर दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच एक मसाला पट आहे. मध्यांतापर्यंत चित्रपटात विजय म्हणजेच पार्थीबनचा स्वॅग पाहायला मिळतो. चित्रपटात अॅक्शनचा भरणा असल्याचे दिसते. पहिला भाग सर्वांची उत्सुकता वाढवणारा आहे. दुसऱ्या भागात संजय दत्तची एण्ट्री होते. मात्र, हा भाग थोडा रटाळ वाटतो.सतत येणारे अॅक्शन सीन्स कंटाळवाणे वाटतात. फक्त आणि फक्त विजयसाठी चाहते हा चित्रपट पाहू शकतात. लिओ चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, लोकेश कनगराज यांनी प्रेक्षकांचा हिरमोड केला आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
संबंधित बातम्या