मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Terava: स्त्रीशक्तीचं अनोख दर्शन घडवणारा 'तेरवं'; चित्रपटातून दिसणार एका कणखर स्त्रीची गोष्ट!

Terava: स्त्रीशक्तीचं अनोख दर्शन घडवणारा 'तेरवं'; चित्रपटातून दिसणार एका कणखर स्त्रीची गोष्ट!

Feb 07, 2024 11:24 AM IST

Terava Marathi Movie: एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा ‘तेरवं’ हा चित्रपट जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Terava Marathi Movie
Terava Marathi Movie

Terava Marathi Movie: गेल्या काही शतकांमध्ये समाजात बदल घडले असले, तरी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही फारसा पुढारलेला किंवा बदललेला नाही. मात्र, या सगळ्यातही काही महिला अशा आहेत, ज्यांनी सगळ्या समस्यांना तोंड देत हा संघर्षमय प्रवास पूर्ण केला. अशाच एका कणखर स्त्रीची गोष्ट सांगणारा ‘तेरवं’ हा चित्रपट जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ८ मार्चला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हरिष इथापे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात संदीप पाठकसह अनेक गाजलेले मराठी कलाकार दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘तेरवं’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. नरेंद्र जिचकार यांच्या अंजनीकृपा प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे तेरवं चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नरेंद्र राहुरीकर सहनिर्माता आहेत. श्याम पेठकर यांनी ‘तेरवं’ चित्रपटाचं लेखन केलं आहे. तर, सुरेश देशमाने यांनी छायांकन, वीरेंद्र लाटणकर यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे, शर्वरी पेठकर, प्रवीण इंगळे, संहिता इथापे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत.

‘तेरवं’ हा चित्रपट जनाबाई नावाच्या एका स्त्रीची प्रेरणादायी कथा सांगणारा आहे. कौटुंबिक ते सामाजिक आव्हानं येऊनही खंबीरपणे त्याला कसं सामोरं जात वेगळं काम करत आणि स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या जनाबाईच्या स्त्रीशक्तीचं दर्शन या चित्रपटात घडवण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा महिला दिन नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे यात शंका नाही. आता या चित्रपटात कोणकोणते कलाकार कोणत्या भूमिकेत झळकणार, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या चित्रपटाच्या घोषणेमुळे सगळ्यांची उत्सुकता वाढली आहे. एका प्रेरणादायी महिलेची कथा जाणून घेण्यात सगळ्यांनाच भरपूर आतुरता आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग