लॉस एंजेलिसमधील जंगलात लागलेली भीषण आग ही अगदी शहरांपर्यंत येऊन पोहोचली आहे. या आगीतून भारतातील लोकप्रिय अभिनेत्री थोडक्यात बचावली आहे. ही अभिनेत्री कामातून ब्रेक घेऊन काही दिवसांसाठी लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली होती होती. ती तेथे शिक्षण घेत होती. पण तेथे आग लागल्यानंतर अभिनेत्री मायदेशी परतली आहे. ती भारतात येताच प्रतिक्रिया दिली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? आणि ती काय म्हणाली? चला जाणून घेऊया...
लॉस एंजेलिसवरून भारतात परतलेली अभिनेत्री म्हणजे रूपल त्यागी आहे. रूपलने छोट्या पडद्यावरील काही मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच तिने ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मी काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी राहत होती त्या शहरांमध्ये आग लागली होती. आणि आता ती जागा राखेत बदलताना पाहून मन हेलावलं होतं. ही आग एवढं भीषण रुप घेईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.”
रूपलने जेव्हा मुंबईत परतली तेव्हा तिला कळालं की, कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली आहे आणि ती इतकी भीषण झाली आहे की सर्व काही राख झाले आहे. हॉलिवूड चिन्ह पाहण्यासाठी ती कारने गेली होती, आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आता जेव्हा तिला त्याची आठवण येईल तेव्हा त्या आठवणी वेगळ्या अर्थाने आणि रुपात प्रकट होतील असे ती म्हणाली. आठवण म्हणून लॉस एंजेलिसहून काही गोष्टी बरोबर घेऊन आली होती पण आता त्यांना पाहून अभिनेत्रीला वेदना होत आहेत. पण तिचे सर्व मित्र सुरक्षित ठिकाणी आहेत. त्यासाठी तिने देवाचे आभार मानले आहेत.
वाचा: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास अडकणार विवाहबंधनात, कोण आहे ती मुलगी?
“निसर्गाचा असा कोप पाहून मी हादरली. एक आनंदी शहर अचानक जळून राख झाले हे अविश्वसनीय आहे. जीवन अप्रत्याशित आहे याची आठवण करुन देतं. आयुष्य खरोखरच समजण्यापलीकडे आहे आणि मला वाटते की, ते प्रत्येक दिवस पूर्णतः जगण्याच्या कल्पनेला बळ देते. दुसऱ्या दिवशी काय होणार हे आपल्याला कधीच कळत नाही. मला खरोखर आशा आहे की जे बळी पडले आहेत ते लवकरच त्यांचे आयुष्य पुन्हा तयार करण्यात सक्षम होतील आणि पुन्हा मार्गावर येतील” असे रूपल म्हणाली.
संबंधित बातम्या