रुपेरी पडद्यामागचे काळे सत्य अनेकदा समोर आले आहे. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रींना खऱ्या आयुष्यात अनेक वाईट अनुभव आले आहेत. काही अभिनेत्रींने त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे अनुभव उघडपणे सांगितले तर काहींनी सर्वांसमोर येण्यास नकार दिला. नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने कास्टिंग काऊचबाबत जाहीरपणे वक्तव्य केलं आहे. तसेच सेटवर तिला चुकीची वागणून दिली असल्याचे सांगत या अभिनेत्रीने निषेध व्यक्त केला आहे.
सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे संध्या नायडू आहे. तेलुगु इंडस्ट्रीमध्ये संध्या हे नाव खूप मोठे आहे. नुकताच संध्याने एका मुलाखतीमध्ये तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. कास्टिंग काऊचविषयी बोलताना संध्या म्हणाली, “मला मिळालेल्या बहुतेक भूमिका काकू आणि आईच्या होत्या. त्यामुळे ते लोक दिवसा शूटिंग सेटवर मला अम्मा म्हणायचे आणि रात्री झोपायला बोलावायचे.”
वाचा: बिग बी- शाहरुख पेक्षा जास्त हिट सिनेमे, तरीही या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली नाही
पुढे संध्या म्हणाली, "त्यांच्यापैकी एकाने मला विचारले की, मी काय घातले आहे आणि ते ट्रान्सपरन्ट आहे का?" त्यावर संध्याला कळत नव्हते की काय बोलावले आणि काय करावे. तसेच या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने असेही उघड केले की, जेव्हा जेव्हा तिला कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा तिला विचारले जायचे की, तिला हा रोल दिल्यानंतर त्या बदल्यात त्यांना काय मिळणार? कास्टिंग काऊचबाबत उघडपणे बोलताना संध्या नायडूनं असाही दावा केला की, रोल मिळाल्यानंतर तिला व्हॉट्सअॅप चॅट करण्यास भाग पाडले गेले. संध्याने जेव्हा हा खुलासा केला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. संध्याने तेलुगु सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने या मुलाखतीमध्ये सेटवर देखील चुकीची वागणूक मिळाल्याचे सांगितले आहे.
संबंधित बातम्या