मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडित करणार साजिद नाडियाडवालासोबत काम; नव्या धमाकेदार चित्रपटाची घोषणा!

Tejaswini Pandit: तेजस्विनी पंडित करणार साजिद नाडियाडवालासोबत काम; नव्या धमाकेदार चित्रपटाची घोषणा!

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 05, 2024 12:45 PM IST

Tejaswini Pandit Upcoming Project: बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवालासोबत तेजस्विनीने हातमिळवणी केली आहे.

Sajid Nadiadwala upcoming marathi Project
Sajid Nadiadwala upcoming marathi Project

Tejaswini Pandit Upcoming Movie name: मराठी सिनेसृष्टीत अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवालासोबत हात मिळवणी केली आहे. आता तेजस्विनी साजिदसोबत काम करणार की त्याच्या चित्रपटात दिसणार याबाबत जाणून घेऊया...

मराठी चित्रपटातील काही निकष बाजूला ठेवून, मराठी कथानकाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. या भागीदारीचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम सज्ज झाली असून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातून मिळणार आहे, हे नक्की! नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
वाचा: नंत अंबानींच्या कार्यक्रमात शाहरुख खानचा 'अपमान'? Viral Videoमुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट

या आगामी प्रोजेक्टविषयी बोलताना तेजस्विनी पंडित म्हणते, '' ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो." 
वाचा: राहाने अभिषेक बच्चनला पाहिले अन्...; प्रीवेडिंग सोहळ्यातील रणबीरच्या लेकीचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

पुढे तेजस्विनी म्हणाली,  "आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी 'गेम चेन्जर' ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत. ''
वाचा: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

WhatsApp channel