मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajmata Jijau: शिवबाचे शिवराय घडविणाऱ्या राजमाता जिजाबाईंवर येणार सिनेमा, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

Rajmata Jijau: शिवबाचे शिवराय घडविणाऱ्या राजमाता जिजाबाईंवर येणार सिनेमा, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 13, 2024 08:56 AM IST

Swarajya Kanika Jijau: एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' असे आहे.

Tejaswini Pandit
Tejaswini Pandit

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले. बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कनिका जिजाऊ यांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न सर्वांना पडला होता.

'स्वराज्य कनिका जिजाऊ' या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. चित्रपटात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार याबाबत सर्व माहिती सध्या गुलदसत्यात ठेवण्यात आली आहे. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाती तारीख देखील समोर आलेली नाही.
वाचा: ना हिंदू, ना मुस्लिम; ख्रिश्चन पद्धतीने पार पडला आमिरच्या लेकीचा विवाहसोहळा

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल म्हणाली, "ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य - स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय !! अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली ह्याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा ह्या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच !"

WhatsApp channel

विभाग