मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रानबाजार: बोल्ड सीन्सवरून ट्रोल करणाऱ्यांना तेजस्विनी पंडितचे सडेतोड उत्तर
रानबाजार
रानबाजार (HT)
20 May 2022, 4:03 AM ISTAarti Vilas Borade
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 4:03 AM IST
  • तेजस्विनीने रानबाजार या वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. तिला या सीन्सवर सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता तेजस्विनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'रानबाजार' ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीत एकदम वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन्स पाहून तिला ट्रोल केले जात आहे. आता तेजस्विनीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

तेजस्विनीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी तिने ट्रोलिंग, राजकिय विषय, सीरिजमधील भूमिका या गोष्टींवर वक्तव्य केले. 'मला वैयक्तिक दृष्ट्या या गोष्टींचा त्रास होत नाही. यापूर्वी ही झाला नाही आणि आताही होणार नाही. मी ट्रोलिंगकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. जेव्हा चर्चा होते तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचते. त्याच सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी आल्या. त्याकडे फार लक्ष न देता आपल्याला त्यातील जे चांगले वेचून घ्यायचे आहे आणि पुढे निघायचे' असे तेजस्विनी म्हटली.

पुढे ती म्हणाली, 'ज्या लोकांनी टीझर पाहून मला शिव्या घातल्या ते किती वेळ घालत बसणार आहेत. त्यांना वेब सीरिज पाहायला लागेल. मला नाही वाटत सीरिज पाहिल्यावर ते शिव्या घालतील. कारण ही तशा प्रकारची सीरिज नाहीये.'

‘रानबाजार’च्या टीझरमधून तेजस्विनी पंडीत आणि प्राजक्ता माळीचा थक्क करणारा मादक अंदाज प्रेक्षकांनी नुकताच अनुभवला आहे. ट्रेलरमधून यातील इतर चेहरेही आता समोर आले आहेत. यात उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ही पॅलिटिकल क्राईम थ्रिलर वेब सीरिज आज २० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook