मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तिचा सहवास आम्हाला खूप कमी मिळाला पण तक्रार…', तेजस्विनीची आईसाठी खास पोस्ट
तेजस्विनी पंडित
तेजस्विनी पंडित
27 June 2022, 17:28 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 June 2022, 17:28 IST
  • (tejaswini pandit)तेजस्विनीच्या आई आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना नुकताच 'मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सोबतच तिने नुकतंच निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. इतक्या कर्तबगार मुलीची आई देखील तितकीच कर्तबगार आहे. तेजस्विनीच्या आई आणि अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना नुकताच 'मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या निमित्ताने तेजस्विनीने आपल्या आईसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आईचा सहवास आपल्याला कमी लाभला असला तरी तिच्या कामाचा आपल्याला अभिमान आहे असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ज्योती यांना पुरस्कार देतानाचे काही फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यात तिच्या आईसोबत तेजस्विनी आणि तिची बहीण दोन्ही बाजूला उभ्या दिसत आहेत. आईचं कौतुक करत तिने लिहिलं, 'मानाचा बालगंधर्व जीवनगौरव पुरस्काराने' ज्योती चांदेकर ( आईला ) गौरवण्यात आले. 50 वर्षाची कारकीर्द ! अत्यंत कष्टाने साधलेला दीर्घ कला प्रवास 🤗 आईच्या व्यग्र schedule मुळे तिचा सहवास आम्हाला मुली म्हणून खूप उशीरा मिळाला, आईच्या हाताची चव आम्ही पहिल्यांदा वयाच्या 16 व्या वर्षी चाखली...अश्या "आई सोबत असण्याचे" अनेक क्षण आम्हाला अनुभवता आले नाहीत. पण ह्याची अजिबात तक्रार नाही...कारण आमची आई आमचं घर संभाळण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन , अनेक बलिदानं देऊन स्वतः चं अस्तित्व घडवत होती ! आणि आज तिला हा मानाचा पुरस्कार स्विकारताना बघून हा संघर्ष सार्थकी लागल्याचे आम्ही साक्षीदार झालो.'

 

बाबा असता तर आईला हा पुरस्कार स्विकारताना तिचा आनंद द्विगुणित झाला असता ! कारण तिच्या ह्या यशामध्ये त्याचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. कारण आई घरी नसताना बाप असून आईची भूमिका बाबाने लीलया पेलली... आईच्या डोळ्यात समाधानाचे ,आनंदाचे अश्रू बघून तिचा वारसा मी पुढे चालवते आहे, त्याची जबाबदारी कळत नकळत खूप मोठी आहे आणि ती माझ्यावर आहे ह्याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच अत्यंत उत्तुंग कलाकाराची मी लेक आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. अभिनंदन आई आणि धन्यवाद बालगंधर्व परिवार !

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग