छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे तेजस्वी प्रकाश. आज ती सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. तिने नागिन ७, स्वरागिनी, खतरों की खिलाडीमध्ये काम केले आहे. तिचे सोशल मीडियावर देखील लाखो चाहते आहेत. तेजस्वी कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या तेजस्वी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तिने परिधान केलेल्या आऊटफिटमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
तेजस्वी प्रकाशने नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर शिमर असलेली ट्राउजर परिधान केली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तेजस्वी अतिशय सुंदर दिसत आहे. पण काही सोशल मीडिया यूजर्सला तेजस्वीचा हा लूक आवडलेला नाही. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
वाचा: 'तिकडे वडिलांना अग्नी देत होते आणि मी हास्यजत्रेच्या खूर्चीत', प्रसाद ओकने सांगितला धक्कादायक अनुभव
तेजस्वीचा हटके लूक पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'हिच्या ड्रेसिंग सेंसला काय झाले आहे?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'बकवासचे नाव फॅशन आहे' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'ही कोणती स्टाइल आहे? हिच्या पेक्षा चांगली तर उर्फी आहे' असे म्हणते तेजस्वीला चांगलेच सुनावले आहे. सध्या तेजस्वीच्या या फोटोवर अनेक निगेटीव्ह कमेंट येत आहे. तर काही यूजरने ती सुंदर दिसत आहे असे देखील म्हटले आहे.
वाचा: 'तुला पाहते रे' मालिकेतील अभिनेत्रीचे छोट्या पडद्यावर पुनरागम, नवा प्रोमो प्रदर्शित
तेजस्वी प्रकाश ही बिग बॉस सिझन १५मध्ये आली होती. या सिझनची विजेती ठरली होती. याच शोमध्ये तेजस्वी अभिनेता करण कुंद्राच्या प्रेमात पडली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दोघांनीही प्रेमाची कबूली दिली. आज ते सगळीकडे एकत्र फिरताना दिसत आहेत. त्यांनी 'लॉकअप' आणि 'टेम्पटेशन आयलंड' या दोन्ही शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. तेजस्वी ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात देखील दिसली होती. आता तेजस्वी कोणत्या मालिकेतून पुनरागमन करते हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.