सेलिब्रिटी मास्टरशेफ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक हे कायम अतिशय चवदार आणि अनोखे पदार्थ बनवताना दिसतात. या शोच्या माध्यमातून अनेक सेलेब्स तुम्हाला एकत्र स्वयंपाक करताना दिसणार आहेत. यावेळी शोमध्ये दीपिका कक्कर, तेजस्वी प्रकाश, अनुपमा शोमधील गौरव खन्ना, मिस्टर फैजू, निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी आणि इतर काही प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसणार आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का या सेलिब्रिटींशी शोसाठी तगडे मानधन देखील घेतले आहे.
सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमाचा पहिलाच भाग विशेष चर्चेत आला. त्यानंतर आता स्पर्धकांच्या फीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तेजस्वी प्रकाश या शोमध्ये सर्वाधिक पैसे घेत असल्याचे बोलले जात आहे. टेलिकोटियाने दिलेल्या वृत्तानुसार, तेजस्वी दर आठवड्यासाठी ३-४ लाख रुपये घेते.
सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात गौरव खन्ना २.५ लाख रुपये घेत आहे. दीपिका कक्कर बऱ्याच काळानंतर या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या शोसाठी ती 2-3 लाख रुपये घेत आहे. निक्की तांबोळी दीड लाखांसाठी तिथे आली आहे. राजीव आडतिया १ लाख रूपये फी घेतो. अर्चना गौतम यांच्या दीड लाख रुपये घेते. तर मिस्टर फैजल 2 लाख, पवित्र रिश्तामधील अभिनेत्री उषा नाडकर्णी १ लाख रूपये घेतात.
वाचा: शाहरुख खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, इतक्या किंमतीत येईल मुंबईत घर
सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी मास्टरशेफ कार्यक्रमाचा प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. तेजस्वी बिग बॉस 15 ची विजेती ठरली आहे. शो जिंकल्यानंतर ती नागिन 6 मध्ये दिसली. नागिन म्हणून ती प्रेक्षकांना विशेष आवडली होती. या शोनंतर तेजस्वी ब्रेकवर होती आणि आता ती सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये झळकत आहे.
संबंधित बातम्या