Tejashri Pradhan Second Marriage : 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चित्रपट गाजवताना दिसतेय. तेजश्री प्रधान ही मराठी मालिकांचा एक आघाडीचा चेहरा आहे. तिने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत. सध्या तेजश्री मालिकांमध्ये दमदार अभिनय करताना दिसतेय. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता लवकरच तिचा एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'हॅशटॅग तदेव लग्नम' असे या चित्रपटाचे नाव असून, यात सुबोध भावे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री प्रधान हिने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्याला पुन्हा एकदा लग्न करायचं आहे अशी इच्छा बोलून दाखवली.
तेजश्री प्रधान हिने एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिलखुलास गप्पा मारल्या. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल नेहमीच काहीना काही प्रश्न विचारले जातात. अभिनेत्री अनेकदा अशा प्रश्नांना उत्तर देणं टाळते. मात्र, यावेळी तिने या प्रश्नावर दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे. तिच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम' या चित्रपटात लग्न संस्था, मॅट्रिमोनियल साईट या विषयांवरच भाष्य केलं गेलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने नव्या चित्रपटाविषयी बोलतानाच दुसरं लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. तेजश्री म्हणाली की, 'हो मला लग्न करायचं आहे. पण, मला आवडेल आणि भावेल असा जोडीदार अद्याप भेटलेला नाही. असा एखादा जोडीदार भेटला, तर मी निश्चितच लग्न करेन. आपण जसजसे मोठे होत जातो, आयुष्यात पुढे जातो, तसतशा आपल्या अपेक्षादेखील कमी होत जातात. मला पण पुन्हा नव्याने संसार थाटायचा आहे. पण, एक मनानं स्वच्छ, निर्मळ, कमिटमेंट पाळणारा आणि मला आयुष्यभर साथ देणारा, माझी त्याच्यावर जबाबदारी आहे, असं म्हणणारा आणि मानणारा कोणीतरी भेटला, तर मी नक्कीच लग्न करेन आणि मला संसार थाटायला आवडेल.'
तेजश्री प्रधान हिने २०१४ साली 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेदरम्यान सहकलाकार अभिनेता शशांक केतकर यांच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांची जोडी 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घरोघरी पोहोचली होती. खऱ्या आयुष्यात देखील दोघांनी लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांचे चाहते आनंदी झाले होते. पण लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. २०१५मध्ये त्यांनी एकमेकांना घटस्फोट देत एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर शशांक केतकर यांनी दुसरं लग्न करून नव्याने आयुष्याची सुरुवात केली. मात्र, तेजश्री ही अद्यापही सिंगल आहे. आता तेजश्री प्रधान हीची मुख्य भूमिका असलेला 'हॅशटॅग तदेव लग्नम' हा चित्रपट २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या