Tejashri Pradhan: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. तिने काही मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. या मालिकेतील तिचे पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण सेटवर शूट करत असताना एकदा तेजश्री डायलॉग विसरली आहे. तिचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल.
गेल्या आठवड्याच्या ‘आता होऊ दे धिंगाणा २’मध्ये ‘प्रेमाची गोष्ट’ व ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या दोन मालिकांमध्ये सांगीतिक लढत झाली. यावेळी तेजश्री व अपूर्वा नेमळकर यांनी एक नाटक सादर केले. या नाटकात तेजश्री अपूर्वाची भूमिका साकारत आहे तर अपूर्वा तेजश्रीची. हे नाटक सुरु असताना तेजश्री अचानक डायलॉग विसरते. ती सर्वांची माफी मागून पुन्हा डायलॉग एण्ट्री करते. त्यानंतर तिचे डायलॉग बरोबर वाटतात. सेटवर डायलॉग विसरल्याचा तेजश्रीचा व्हिडीओ ‘मुक्ता-सागर फॉरएवर’ या फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.
वाचा: रश्मिका मंदानाचा जीव थोडक्यात बचावला; अभिनेत्रीच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग
दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा २’च्या गेल्या आठवड्याच्या भागात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही टीम ‘प्रेमाची गोष्ट’च्या टीमवर वरचढ ठरली. १ लाख २०५ रुपये घंटाघरामधून आणून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने बाजी मारली. तेव्हाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तेजश्रीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिची मुक्ता ही भूमिका विशेष गाजत आहे. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.