मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejashri Pradhan: ठरलं! तेजश्री प्रधान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार 'या' चित्रपटात

Tejashri Pradhan: ठरलं! तेजश्री प्रधान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार 'या' चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 01, 2023 12:59 PM IST

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानसोबत अभिनेता सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

Tejashri Pradhan
Tejashri Pradhan

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. मालिकांनी तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. आता तेजश्री एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तेजश्रीच्या आगामी चित्रपटाचे नाव 'हॅशटॅग तदेव लग्नम' असे आहे. आनंद गोखले दिग्दर्शित हा कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या चित्रपटात सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तेजश्री आणि सुबोधला एकत्र पाहण्यासाठी सर्वजण आता उत्सुक आहेत.

नावावरूनच हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणारा दिसतोय. मात्र या चित्रपटात काय पाहायला मिळणार, हे चित्रपट आल्यावरच कळेल. शेखर मते निर्मित या चित्रपटाची कथा आणि पटकथा आनंद दिलीप गोखले यांचीच आहे. या चित्रपटासाठी मंदार चोळकर आणि क्षितीज पटवर्धन यांनी गीतलेखन केलं आहे तर पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, "नुकतीच आम्ही चित्रीकरणाला सुरुवात केली असून सध्या चित्रपटाबद्दलच्या अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. लग्नसंस्थेवर आधारित जरी हा चित्रपट असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. एका परिपक्व नातेसंबंधावर प्रकाशझोत टाकणारी ही कथा आहे. यापूर्वी असा विषय क्वचितच कोणी हाताळला असेल. हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक आणि सहकुटुंब बघावा, असा हा सिनेमा असून लवकरच हा चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. यात अनेक नामांकित कलाकार आहेत."

IPL_Entry_Point

विभाग