Tejashri Pradhan Marathi Movie : मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या एका नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ २० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात ती अभिनेता सुबोध भावे सोबत मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तरीही, तेजश्री एक वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने चित्रपटगृहांच्या मर्यादित उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
तेजश्री प्रधान हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने लिहिले की, "‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ हा आमचा चित्रपट पुणे व मुंबईमध्ये (मिळालेल्या मोजक्या चित्रपटगृहांमध्ये) हाऊसफुल सुरू आहे. पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहच उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे.' तेजश्रीच्या या पोस्टने सोशल मीडियावर एक चर्चेला वाव देताच, चित्रपटगृहांच्या अभावामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनावर पडणारा परिणाम, विशेषत: छोटे चित्रपटगृह कमी पडत असलेली समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. तरीही, ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ या चित्रपटाचा प्रारंभ चांगला झाला आहे आणि अनेक ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल असल्याचे दिसत आहेत.
चित्रपटाची कथा लग्नाच्या विचारांभोवती फिरते. त्यात, लग्न करणाऱ्या किंवा लग्नाची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींच्या जीवनातील विविध पेच आणि त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोण रंजक पद्धतीने उलगडला जातो. या चित्रपटाच्या कथेत विनोदी छटा देखील दिसून येतात, ज्यामुळे तो चित्रपट आपल्या संपूर्ण कुटुंबासोंबत पाहता येईल असा आहे. या चित्रपटात तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्याशिवाय प्रदीप वेलणकर, संजय खापरे, शर्मिष्ठा राऊत, आणि मानसी मागीकर यांसारखे दमदार कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.
‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ हा चित्रपट एका वेगळ्या धर्तीवर आधारित आहे. त्यात, लग्नाशी संबंधित असलेल्या समकालीन प्रश्नांचा उलगडा विनोदी शैलीत करण्यात आला आहे. ज्यामुळे तरुण पिढीला आकर्षित करणे शक्य झाले आहे. चित्रपटात जो विनोदाचा तडका आहे, तो मनोरंजन करणारा आहे, पण त्यात दडलेले गंभीर संदेशही प्रेक्षकांच्या मनात ठराविक ठिकाणी पोहोचतात. दरम्यान, तेजश्रीच्या या पोस्टने मराठी चित्रपट उद्योगाच्या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधले आहे, जे म्हणजे चित्रपटगृहांची कमतरता. त्यामुळे अनेक मराठी चित्रपटांना योग्य व पुरेशा प्रमाणात प्रदर्शित होण्याचा संधी मिळत नाही. ही समस्या केवळ या चित्रपटाला भेडसावली नाही तर, याधीही यामुळे अनेक चित्रपटांना फटका बसला आहे.
संबंधित बातम्या