कलाकारांचे आयुष्य हे कायमच चर्चेत असते. कधी त्यांच्या लव्ह लाइफमुळे तर कधी सिनेमांमुळे ते चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान देखील नेहमीच तिच्या खासगी आयुष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेत काम करत संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेतील अभिनेत्यासोबत तेजश्रीने लग्न केले होते. मात्र, तिचे हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या कित्येक वर्षानंतरही तेजश्रीने मालिकेतील लग्नातील मंगळसूत्र जपून ठेवले आहे. त्यामागचे कारण काय? चला जाणून घेऊया...
तेजश्री सध्या तिचा सिनेमाचे 'हॅशटॅग तदेव लग्नम'चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. एका मुलाखतीमध्ये तिला पहिल्या लग्नातील मंगळसूत्रावरुन प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने, “‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका करत होते, तेव्हा जान्हवीचं मंगळसूत्र खूप लोकप्रिय झालं होतं. अफाट लोकप्रियता त्या मंगळसूत्राला मिळाली आहे. आजही कुठल्याही ज्वेलरी शॉपमध्ये गेलं तरी त्याबद्दल बोललं जातं. त्यामुळे ते मंगळसूत्र खूप लोकप्रिय झाल्याने ते माझ्याकडे ठेवायचं असं मी ठरवलं. कारण माझ्या आयुष्यातली पहिली लोकप्रिय झालेली ही गोष्ट होती. त्यामुळे मी या मालिकेतील मंगळसूत्र जपून ठेवलं आहे” असे उत्तर दिले.
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील जान्हवी ही भूमिका तेजश्रीने साकरली होती. यी भूमिकेला प्रेक्षकांचे अफाट प्रेम मिळाले होते. जेव्हा श्री आणि जान्हवीचे लग्न झाले तेव्हा त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. श्रीने जान्हवीला घातलेले मंगळसूत्र अनेकांच्या गळ्यात पाहायला मिळाले होते. तेजश्रीने ते मंगळसूत्र आजही जपून ठेवले आहे.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?
तेजश्रीचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच तेजश्री मराठीसह हिंदीत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या ‘दर्मियान’ नावाच्या चित्रपटाची स्क्रिनिंग झाली. मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तेजश्रीचा हा चित्रपट दाखवण्यात आला होता.
संबंधित बातम्या