Tejashri Pradhan Upcoming Movie: सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tejashri Pradhan Upcoming Movie: सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात

Tejashri Pradhan Upcoming Movie: सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र, दिसणार 'या' चित्रपटात

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 15, 2024 12:26 PM IST

Tejashri Pradhan Upcoming Movie: गेल्या काही दिवसांपासून सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे एकत्र काम करणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यांच्या सिनेमाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

Tejashri Pradhan Upcoming Movie
Tejashri Pradhan Upcoming Movie

मराठी चित्रपटसृष्टीमधील सोज्वळ सून म्हणून अभिनेत्री तेजश्री प्रधान ओळखली जाते. तिच्या प्रत्येक प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण कायमच उत्सुक असतात. लवकरच तेजश्री महत्त्वाच्या भूमिकेत असणारा नवा चित्रपट येणार आहे. तसेच या चित्रपटात तेजश्रीसोबत अभिनेता सुबोध भावे दिसणार आहे. आता या चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी..

काय आहे चित्रपटाचे नाव?

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या या चित्रपटाचे नाव 'हॅशटॅग तदेव लग्नम' असे आहे. चित्रपटाचे नाव ऐकूनच जरा विचारात पडला असाल ना? हॅशटॅग हा आजचा ट्रेंडिंगमधला शब्द आहे तर तदेव लग्नम हा संस्कृत शब्द त्यामुळे या दोघांचा परस्परांशी काय संबंध आहे? असे अनेक प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत असतील. हीच उत्सुकता कायम ठेवत, हा भन्नाट विषय घेऊन तरुणाईला आणि त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी 'हॅशटॅग तदेव लग्नम' सज्ज झाला आहे.

तेजश्रीने शेअर केले पोस्टर

तेजश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने नुकताच 'हॅशटॅग तदेव लग्नम' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्यामध्ये लग्नातील धमाल पाहायला मिळणार आहे, हे कळतेय. परंतु आता हे 'हॅशटॅग तदेव लग्नम' नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ४ ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान हे प्रथमच एकत्र येत आहेत. त्यामुळे या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्कीच!

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

शुभम फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची प्रमुख भूमिका असून या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आनंद दिलीप गोखले यांनी केले आहे. या चित्रपटाचे शेखर विठ्ठल मते निर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून येत्या ४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
वाचा: दीपिका पादूकोणला मिठी मारताच ऐश्वर्याचे डोळे का पाणावले? नेमकं काय झालय?

काय म्हणाले दिग्दर्शक

'हॅशटॅग तदेव लग्नम' या चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक आनंद गोखले म्हणाले की, "तदेव लग्नम ज्यांचा भावार्थ अर्थ असा की, तेच हे एकत्र येणे. आता हेच शीर्षक या चित्रपटासाठी का, हे जाणून घेण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आता एवढेच सांगेन की, हा एक धमाल चित्रपट आहे.''

Whats_app_banner