Actress Tejashi Pradhan : आपल्या दमदार अभिनयाने छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या चाहत्यांना आता धक्का बसणार आहे. तेजश्रीने तिची गाजत असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती या मालिकेत ‘मुक्ता कोळी’ ही मुख्य भूमिका साकारत होती. मात्र, आता तिने या भूमिकेचा आणि मालिकेचा निरोप घेतल्याचे समोर आले आहे. तेजश्रीने ही मालिका सोडल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता ‘मुक्ता’ म्हणून दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. तिने ही मालिका का सोडली, याचे कारण देखील आता समोर आले आहे.
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय ठरत असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेचं कथानक सध्या एका निर्णायक वळणावर पोहोचलं आहे. या मालिकेत नुकतंच पाहायला मिळलं की, सावनी हिने तिच्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामुळे आता मुक्ता आणि सागर यांनी तिला हाताला धरून घराबाहेर काढलं आहे. मालिकेतील हा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र, यातच आता तेजश्री ही मालिका सोडत असल्याचे कळताच सगळ्यांना धक्का बसला आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे आणि तेजश्री प्रधान हे कलाकार ‘सागर’ आणि ‘मुक्ता’ या मुख्य भूमिका साकारत होते.
‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून तेजश्री प्रधान घराघरांत पोहोचली होती. यानंतर तिने ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत देखील मुख्य भूमिका साकारली होती. सध्या ती ‘प्रेमाची गोष्टी’ या मालिकेत झळकत होती. मात्र. आता तिने या मालिकेतून बाहेर पडली आहे. सध्या तेजश्री प्रधान हिच्या हातात अनेक चित्रपट आणि इतर प्रोजेक्ट्स देखील आहेत. यामुळे तिच्याकडे मालिकेच्या शूटिंगसाठी पुरेसा वेळ नाही. सध्या तारखा नसल्याचे कारण देत, तेजश्री प्रधान हिने ही मालिका सोडली आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत आता तेजश्री प्रधान हिची भूमिका म्हणजेच ‘मुक्ता’ ही भूमिका अभिनेत्री स्वरदा ठिगळे साकारणार आहे. स्वरदा ही देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने काही हिंदी-मराठी मालिकांमध्ये भूमिका साकरल्या आहेत. लग्नानंतर तिने वर्षभर कामातून ब्रेक घेतला होता. आता ती या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत स्वरदा ठिगळे मुख्य भूमिकेत दिसलेली. आता ती ‘मुक्ता’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या