तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’बाबत मोठी अपडेट आली समोर, वाचा नेमकं काय?-tejashree pradhan and subodh bhave upcoming movie hashtag tadaiv lagnam poster is out ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’बाबत मोठी अपडेट आली समोर, वाचा नेमकं काय?

तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’बाबत मोठी अपडेट आली समोर, वाचा नेमकं काय?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 17, 2024 04:08 PM IST

Hashtag Tadaiv Lagnam: गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या 'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Hashtag Tadaiv Lagnam
Hashtag Tadaiv Lagnam

Hashtag Tadaiv Lagnam: मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार तेजश्री प्रधान आणि सुबोध एकत्र करणार असल्याचे कळताच चाहत्यांना आनंद झाला होता. त्यांचा 'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांच्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आती ही अपेडट काय आहे? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

काय आहे चित्रपटाचे पोस्टर?

नुकतेच सोशल मीडियावर 'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील 'हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव म्हणजे सुबोध भावे दिसत आहे तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी म्हणजे तेजश्री प्रधान दिसत आहे.

काय असणार चित्रपटाची कथा?

'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटात लग्नकार्यातील धमाल पाहायला मिळणार आहे. याशिवाय आजच्या काळातील लग्न, सध्याच्या तरुण पिढीचे विचारही दिसणार आहेत. तसेच दोघांच्या प्रवासाची पार्श्वभूमीही वेगळी असल्याने चित्रपटाची कथा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल, असे म्हणायला हरकत नाही. पण हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?

'हॅशटॅग तदेव लग्नम्' हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन आनंद दिलीप गोखले यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते शेखर विठ्ठल मते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान एकत्र येत आहेत. या दोघांसोबत कोणते कलाकार दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वाचा : इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

दिग्दर्शकाने व्यक्त केल्या भावना

'हॅशटॅग तदेव लग्नम्' या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले म्हणतात, "आयुष्याच्या वाटेवर लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. आत्ताची पिढी लग्न हा विषय आणि नातेसंबंधांवर काय भाष्य करते, यावर आधारित असणारा हा चित्रपट सर्वांनाच आपलासा वाटेल, असा आहे. त्यामुळे या चित्रपटातील वेगळेपणा बघण्यासाठी प्रेक्षकांना २० डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.”

Whats_app_banner