Tehelka Bhai Viral Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा टीव्ही रिॲलिटी शो ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये ‘तहलका भाई’ उर्फ सनी आर्याचेही नाव सामील आहे. ‘बिग बॉस १७’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर देखील तहलकाचे नाव सतत चर्चेत आहे. नुकतीच सनी आर्याने मन्नारा चोप्रा हिला ४० लाख रुपयांची सोन्याची चेन भेट दिली आहे. आता तहलका भाईची पत्नी दीपिका आर्या हिला या प्रकरणाची कुणकुण लागली आहे. तहलकाने स्वतःच्या गळ्यातील महागडी चेन मन्नाराला दिल्याने आता दीपिका भयंकर संतापली आहे. याबद्दल कळताच तहलका भाईच्या पत्नीने त्याला मीडियासमोरच मारायला सुरुवात केली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या शो दरम्यान ‘बिग बॉस १७’ची सेकंड रनर अप मन्नरा चोप्रा आणि तहलका भाई यांच्यात खूप चांगले बाँडिंग दिसले होते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर येण्याच्या एक दिवस आधी तहलकाने मन्नाराला सोन्याची साखळी भेट दिली आहे, ज्याची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. आता याबाबत सनी आर्यचा एक लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे, जो इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पापाराझी तहलका भाईला ४० लाख रुपयांच्या सोन्याच्या साखळीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा तहलकाची पत्नी दीपिका खूपच आश्चर्यचकित झाली होती. त्यानंतर तिने सगळ्यांसमोरच पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या व्हिडीओमध्ये ती तहलकाला विचारते की, ‘कुणासाठीही तू आता तुझे घर विकणार का?’ अशाप्रकारे दीपिका आर्या मन्नारा चोप्राला सोन्याची चेन दिल्याने नाराजी व्यक्त करताना दिसली आहे. मात्र, दीपिका आणि तहलकाच्या भांडणाचा हा व्हिडीओ प्रँक आहे की, सनीची पत्नी खरोखरच संतापली आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, काही जण ती खरंच संतापली असल्याचे म्हणत आहेत.
‘तहलका भाई’ यूट्यूबवर त्याच्या मजेशीर प्रँक व्हिडीओंसाठी प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे त्याला सलमान खानच्या ‘बिग बॉस १७’मध्ये एन्ट्री मिळाली होती. मात्र, अभिषेक कुमारसोबत झालेल्या बाचाबाचीमुळे त्याला बेघर व्हावे लागले होते. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर देखील तो प्रचंड चर्चेत असतो.
संबंधित बातम्या