Teachers Day 2023: राणी मुखर्जी ते शाहरुख खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारली शिक्षकांची भूमिका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Teachers Day 2023: राणी मुखर्जी ते शाहरुख खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारली शिक्षकांची भूमिका

Teachers Day 2023: राणी मुखर्जी ते शाहरुख खान; ‘या’ कलाकारांनी पडद्यावर साकारली शिक्षकांची भूमिका

Published Sep 05, 2023 09:59 AM IST

Teachers Day 2023 Special: खऱ्या आयुष्यातले शिक्षक तर आपल्याला कायम लक्षात राहतातच. मात्र, कित्येकदा फिल्मी पडद्यावर कलाकारांनी साकारलेले शिक्षकही आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात.

Teachers Day 2023
Teachers Day 2023

Teachers Day 2023 Special: शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज प्रत्येक विद्यार्थी आपल्या गुरूंची अर्थात शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शिक्षकांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. आपण कितीही मोठे झालो तरी, शिक्षकांची प्रतिमा आपल्या मनात कायम ताजी असते. खऱ्या आयुष्यातले शिक्षक तर आपल्याला कायम लक्षात राहतातच. मात्र, कित्येकदा फिल्मी पडद्यावर कलाकारांनी साकारलेले शिक्षकही आपल्या मनात कायमस्वरूपी घर करून राहतात. अगदी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते शाहरुख खानपर्यंत अनेकांनी मोठ्या पडद्यावर शिक्षकाची भूमिका साकारली आहे.

शाहरुख खान

‘चक दे इंडिया’ या चित्रपटात शाहरुख खान हॉकी संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात त्याने साकारलेला प्रशिक्षक एक लढाई हरतो, पण दुसऱ्या लढाईसाठी मात्र तो जिद्दने तयारी करतो. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या या महिला खेळाडूंना संघटीत करून, त्यांच्यात देशप्रेम जागवतो आणि भारताला जिंकवूनच देतो.

Jawan First Show: शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझच भारी! ‘या’ ठिकाणी सकाळी ५ वाजता प्रदर्शित होणार चित्रपट

राणी मुखर्जी

‘हिचकी’ या चित्रपटात राणी मुखर्जीने एका अशा शिक्षिकेची भूमिका साकारली होती, जिला स्वतःला वारंवार उचाक्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सुरुवातीला तिचे विद्यार्थी तिची चेष्टा करतात. पण, नंतर राणी मुखर्जी स्वतः एक आव्हान स्वीकारते आणि आपल्या सारख्या इतर मुलांना आश्वासक बनून मार्ग दाखवते.

सुष्मिता सेन

‘मैं हूं ना’ या चित्रपटात सुष्मिता सेन एका सिझलिंग टीचरच्या भूमिकेत दिसली होती. तिची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली होती. आजही जेव्हा सुष्मिता सेनचे नाव येते, तेव्हा ‘मैं हूं ना’ चित्रपटात लाल साडी परिधान करून पदर उडवत येणारी ‘चांदनी’ प्रत्येकाला आठवते.

अमिताभ बच्चन

‘ब्लॅक’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एका अपंग आणि मतिमंद मुलीला जगण्याचा मार्ग शिकवणाऱ्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ते या मुलीला व्यावहारिक मार्गाने कसे जगायचे हे शिकवतात आणि तिचा आधार देखील बनतात.

Bambai Meri Jaan: पोटाची भूक अन् इमानदारीमध्ये होणार युद्ध! ‘बंबई मेरी जान’चा ट्रेलर पाहिलात का?

शाहिद कपूर

शाहिद कपूर ‘पाठशाला’ या चित्रपटात शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. मुलांना योग्य शिक्षण मिळावे म्हणून शाळेत सुरू असलेल्या गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शिक्षकाची भूमिका त्याने साकारली होती.

हृतिक रोशन

'सुपर ३०' चित्रपटात हृतिक रोशनने बिहारमधील लोकप्रिय गणितज्ञ आनंद कुमार प्रवास दाखवला होता. या चित्रपटात हृतिक रोशनने एका शिक्षकाचे खरे आयुष्य आणि संघर्ष पडद्यावर उत्कृष्टपणे साकारला होता.

आमिर खान

बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात शिक्षकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे आमिर खान केवळ डिस्लेक्सियाग्रस्त मुलांनाच शिकवत नाही तर, त्यांचा दुस्वास करणाऱ्या पालकांनाही मुलांच्या समस्या समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून देतो.

बोमन इराणी

अभिनेते बोमन इराणी यांनी ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात शिक्षकाची भूमिका साकारली होती. बोमन इराणी यांनी अतिशय कडक शिस्तीचा शिक्षक पडद्यावर चितारला होता.

Whats_app_banner