Teachers Day 2023: बॉलिवूडचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट बघताना तुम्हालाही येईल तुमच्या शिक्षकांची आठवण!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Teachers Day 2023: बॉलिवूडचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट बघताना तुम्हालाही येईल तुमच्या शिक्षकांची आठवण!

Teachers Day 2023: बॉलिवूडचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट बघताना तुम्हालाही येईल तुमच्या शिक्षकांची आठवण!

Published Sep 05, 2023 08:11 AM IST

Teachers Day 2023 Special Films: बॉलिवूडमध्येही असे काही चित्रपट बनले आहेत, जे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रेमळ नाते दाखवतात.

Teachers Day 2023 Special Films
Teachers Day 2023 Special Films

Teachers Day 2023 Special Films: दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस त्या शिक्षकरुपी गुरूंना समर्पित आहे, जे आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी १९६२मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा केला होता. त्यानंतर त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. आजच्या दिवशी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे आपली कृतज्ञता व्यक्त करतात. बॉलिवूडमध्येही असे काही चित्रपट बनले आहेत, जे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रेमळ नाते दाखवतात. चला तर मग, एक नजर टाकूया अशाच काही चित्रपटांवर...

तारे जमीन पर

आमिर खान आणि दर्शिल सफारी अभिनीत ‘तारे जमीन पर’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात डिस्लेक्सिया असणारी मुले आणि त्यांचे पालक या स्थितीचा कसा सामना करतात यावर भाष्य केले गेले आहे. हा चित्रपट चिमुकल्या ईशानची कथा आहे, ज्याला शाळेतील खराब कामगिरीनंतर बळजबरीने एका बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले जाते. मात्र, इथे आल्यानंतर त्याचे शिक्षक त्याला अशा पद्धतीने शिकवतात की, सगळ्यांनाच त्याचा गर्व वाटू लागतो.

चक दे इंडिया

या चित्रपटात एका माजी हॉकी स्टारवर आपल्याच देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप आहे. मात्र, आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी तो भारतीय महिला राष्ट्रीय हॉकी संघाचे प्रशिक्षक बनण्याचा निर्णय घ्रतो. शाहरुख खानने यात प्रशिक्षक ‘कबीर खान’ची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २००७मध्ये प्रदर्शित झाला होता.

Pankaj Tripathi Birthday: अभिनेते पंकज त्रिपाठी दोन वेळा साजरा करतात वाढदिवस! कारण ऐकलंत का?

हिचकी

या चित्रपटात टॉरेट सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या एका महिलेला शहरातील एका उच्चभ्रू शाळेत शिकवण्याची नोकरी मिळते, त्यानंतर ती तिच्या कमकुवतपणाला तिच्या सर्वात मोठ्या ताकदीत बदलते. सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट ब्रॅड कोहेनच्या ‘फ्रंट ऑफ द क्लास’ या कादंबरीवर आधारित असून यात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसली आहे.

सुपर ३०

बिहारमधील लोकप्रिय गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ या चित्रपटात हृतिक रोशन आणि मृणाल ठाकूर झळकले आहेत. हा चित्रपट आनंद कुमार यांची कथा आहे, जे अनेक आव्हानांचा सामना करतात आणि पाटणा येथे ३० गरीब विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी प्रशिक्षण देतात. विकास बहल दिग्दर्शित ‘सुपर ३०’ हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता.

छलांग

राजकुमार राव अभिनीत ‘छलांग’ ही एका आळशी पीई शिक्षकाची कथा आहे. मात्र, या दरम्यान एक नवीन शिक्षक त्याच्या नोकरीला आव्हान देतो आणि त्याच्या आयुष्यातील खास व्यक्तीला त्याच्य्पासून हिरवण्याची धमकी देतो. ‘छलांग’ हा ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर बघता येऊ शकतो.

Whats_app_banner