Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : टीव्ही विश्वात सर्वाधिक काळ चाललेल्या व तरीही लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कार्यक्रमांपैकी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा एक प्रमुख शो आहे. २००८ पासून सुरू असलेल्या या शोमधील प्रत्येक पात्रांच्या टीव्ही रसिकांच्या मनात घर केलं आहे. यातील एक पात्र म्हणजे दयाबेन.
दयाबेन हे पात्र साकारणारी दिशा वाकानी तिच्या खास अभिनयामुळं व हसण्याच्या हटके शैलीमुळं लोकांची विशेष आवडती ठरली आहे. मालिकेतील गडगडाटी हसण्यासाठी प्रसिद्ध असलेली दयाबेन स्वत:च्या प्रसूतीच्या वेळी देखील हसत होती. इतकंच नव्हे तर मंत्रोच्चार करत होती.
दिशानं स्वत: एका मुलाखतीत हे सांगितलं होतं. दिशानं मालिकेतून ब्रेक घेतला आहे. ती सध्या आपल्या मुलांना आणि कुटुंबाला वेळ देते आहे. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.
एका जुन्या मुलाखतीत दिशा वाकाणीनं तिची प्रेग्नेन्सी व प्रसूतीच्या दिवसातील अनुभवांबद्दल सांगितलं होतं. प्रसूतीच्या वेळी ती हसत होती, असं ती म्हणाली होती. 'जेव्हा मी पहिल्यांदा आई झाले तेव्हा मला कळलं की प्रसूतीदरम्यान खूप वेदना होतात. हे कळल्यानंतर मी घाबरले. मी पालकत्वाचा कोर्स करत होतो. मला कोणीतरी सांगितलं की प्रसूतीच्या वेळी ओरडू नये, नाहीतर मूल घाबरतं. त्यामुळं मी डिलिव्हरीच्या वेळी मंत्र जप केला होता आणि बाळाला जन्म देताना हसत होते, असं ती म्हणाली होती.
'प्रसूतीच्या वेळी मी मनातल्या मनात गायत्री मंत्राचा जप करत होते. डोळे मिटून घेतले होते आणि हसत होते. अशा स्थितीतच मी माझ्या मुलीला स्तुतीला जन्म दिला. हा एक चमत्कार होता. मी प्रत्येक गरोदर मातेला या मंत्राचा जप करण्यास सांगते. यातून जी शक्ती मिळते, ती दुसऱ्या कुठल्याही गोष्टीतून मिळणार नाही. गायत्री मातेचा मंत्र प्रत्येक मुलाला यायला हवा, असं ती म्हणाली होती.
अभिनेत्री दिशा वाकानी ही पुन्हा ‘तारक मेहता शो’मध्ये दिसेल अशी चर्चा आहे. तिचे चाहते ती परतण्याची वाट पाहत आहेत. अधूनमधून तशा अफवाही उठत असतात. मात्र, अद्याप तरी अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही.
संबंधित बातम्या