मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tanishaa Mukerji Accident: आईला वाटलेलं माझा मृत्यू झाला...; तनिषा मुखर्जीने सांगितली पहिल्या चित्रपटाची ‘ती’ आठवण!

Tanishaa Mukerji Accident: आईला वाटलेलं माझा मृत्यू झाला...; तनिषा मुखर्जीने सांगितली पहिल्या चित्रपटाची ‘ती’ आठवण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 06, 2024 10:56 AM IST

Tanishaa Mukerji Accident Memories: पहिल्याच चित्रपटाच्या वेळी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातामुळे तिचा जीव देखील धोक्यात आला होता.

Tanishaa Mukerji Accident
Tanishaa Mukerji Accident

Tanishaa Mukerji Accident Memories: बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जी सध्या तिच्या ‘झलक दिखला जा ११’ या शोमुळे चर्चेत आली आहे. या शोमध्ये तनिषा सध्या आपला जलवा दाखवत आहे. या दरम्यान ती अनेक मुलाखती देखील देत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तनिषा मुखर्जी हिने आपल्या पहिल्या चित्रपटाची एक कटू आठवण सांगितली आहे. पहिल्याच चित्रपटाच्या वेळी अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातामुळे तिचा जीव देखील धोक्यात आला होता.

अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने २००३मध्ये ‘श्श्श’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात तनिषा मुखर्जी ही बेशुद्ध झाली होती. इतकंच नाही तर, तिला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातावेळी तनिषाच्या आईला म्हणजेच अभिनेत्री तनुजा यांना वाटले होते की, तिचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी तनुजा खूप घाबरल्या होत्या.

Maharashtracha Favourite Kon: यंदा कोण ठरणार ‘महाराष्ट्राचा फेवरेट’? प्रेक्षकांना देता येणार आपला कौल!

‘श्श्श’ चित्रपटाच्या शूटिंग वेळी तनिशा मुखर्जीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तनिषाला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात ती बेशुद्ध पडली होती. तिची अवस्था पाहून तनुजा यांना वाटले होते की, आपल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तनिषाची अवस्था पाहून त्या खूप घाबरून गेल्या होत्या. तर, तनिषाची अवस्था पाहून डॉक्टरांनी देखील ‘ती पुन्हा कधीच काम करू शकणार नाही’, असे म्हटले होते. त्यावेळी तिच्या डोक्याला मार लागल्यामुळे सूज देखील आली होती.

तनिषा मुखर्जीची अवस्था पाहून चित्रपटाचा दिग्दर्शक देखील घाबरून गेला होता. तनिषाने बरं होऊन पुन्हा चित्रपटाची शूटिंग पूर्ण करावी, असे त्याला वाटत होते. तनिषा बरी न झाल्यास हा चित्रपट मध्यातच थांबेल, याची धास्ती देखील मेकर्सनी घेतली होती. मात्र, या आजारपणातून तनिषा मुखर्जी लवकरच बरी झाली आणि तिने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. डोक्याला सूज असताना देखील तिने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. या चित्रपटानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, ती अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडू शकली नाही.

WhatsApp channel