३४ दिवसांपासून उपाशी, डोक्यावर १.२ कोटींचं कर्ज! ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था अशी का झाली?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ३४ दिवसांपासून उपाशी, डोक्यावर १.२ कोटींचं कर्ज! ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था अशी का झाली?

३४ दिवसांपासून उपाशी, डोक्यावर १.२ कोटींचं कर्ज! ‘तारक मेहता…’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था अशी का झाली?

Published Aug 13, 2024 08:54 AM IST

Gurucharan Singh Latest News: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जुना ‘सोढी’ म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह हा गेल्या ३४ दिवसांपासून उपाशी आहे.

गुरुचरण सिंह
गुरुचरण सिंह

Gurucharan Singh Latest News: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत ‘सोढी’ची भूमिका साकारून लोकप्रिय झालेला अभिनेता गुरुचरण सिंह सध्या प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता अचानक गायब झाल्यामुळे प्रसिद्धी झोतात आला होता. यानंतर त्याच्या आयुष्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता अभिनेता गुरुचरण सिंह गेल्या ३४ दिवसांपासून काहीही न खाता उपाशी राहत असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे सध्या कोणतेही काम नाही. अभिनेता सध्या कामाच्या शोधात आहे.

मालिका सोडल्यानंतर गुरुचरण याने अनेक व्यवसायात आपले नशीब आजमावले. मात्र, प्रत्येक कामात तो अपयशी ठरला असून, त्याच्यावर सध्या १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे खुद्द गुरुचरण यांनेच सांगितले आहे. आता प्रयत्न करून कंटाळा आल्याचेही गुरुचरण म्हणत आहे. गुरुचरण याने नुकतीच एक मुलाखत दिली. यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले

गुरुचरण जातोय आश्रमात

सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंह म्हणाला की, ‘आज ३४वा दिवस आहे आणि मी काहीही अन्न खाल्ले नाही. एखादी गोष्ट फुकटात वाटली जात असेल गुरु आश्रमात, तर मी ती खातो. मी दर सोमवारी आश्रमात जातो. कारण, सोमवारी आम्हाला समोसा किंवा ब्रेड पकोड्याबरोबर चहा किंवा मिठाई खायला मिळते.’

मुलाखतीदरम्यान गुरुचरण सिंह याला असं करण्यामागचं कारण काय असं विचारलं असता तो म्हणाला की, 'मालिका सोडून ४ वर्ष झाली. या चार वर्षांत मी खूप काम करण्याचा प्रयत्न केला. व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात फक्त अपयश मिळालं. मी आता थकलो आहे, आता माझ्याकडे पैसे यायला हवेत. म्हणजे उत्पन्न मिळायला हवं. समोरून काम यायला हवं, जेणेकरून मी आई-बाबांना सांभाळू शकेन आणि माझं कर्ज फेडू शकेन... मी बँकेकडून घेतलेले कर्ज आणि ईएमआय यांचे मिळून तब्बल ५५-६० लाख रुपये झाले आहेत आणि मित्रांकडून जवळजवळ तेवढेच पैसे घेतले आहेत. त्यामुळे सध्या माझ्यावर सुमारे १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

गुरुचरण कर्जामुळे गायब झालेला का?

गुरुचरण याच्यावर खूप कर्ज असल्याने तो बेपत्ता झाल्याची अफवा पसरली होती. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गुरुचरण याला हा प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, ‘मी कर्जबाजारी होतो किंवा कर्ज फेडू शकत नव्हतो, म्हणून गायब झालो नाही. माझ्यावर अजूनही कर्ज आहे आणि माझी नियत चांगली आहे. मी सगळ्यांचे पैसे परत देण्याचा प्रयत्न करतोय.’

Whats_app_banner