Gurucharan Singh TMKOC : प्रसिद्ध टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये 'रोशन सिंह सोढी' साकारणारा अभिनेता गुरचरण सिंह सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी अभिनेत्याने त्याचा हॉस्पिटलमधील व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्याची जवळची मैत्रीण भक्ती सोनी हिने सांगितले होते की, अभिनेत्यावर १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. काही दिवसांनंतर, अभिनेत्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले की, तो आर्थिक अडचणीत आहे आणि सध्या कामाच्या शोधात आहे. आता भक्तीने मीडिया बोलताना सांगितले की, आता गुरुचरण आपला उपवास सोडून अन्न खाण्यास तयार आहे, परंतु त्याची एक अट आहे.
गुरुचरण सिंह याची मैत्रीण भक्ती सोनी हिने एका मुलाखतीत सांगितले की, मला गुरुचरण सिंह यांच्यासाठी एक १३ लाख रुपयांचे ब्रँड डील मिळाले आहे, जे मी आता त्याच्याकडे दिले आहे. यानंतर त्याने आपला उपास सोडण्याचे मान्य केले. या महिन्याच्या अखेरीस तो शूटिंगसाठी मुंबईत येणार आहे. भक्तीने तिच्या एका मैत्रिणीच्या मदतीने गुरुचरणला हे काम मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.
भक्ती सोनी यांनी सांगितले की, गुरुचरण सिंह याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी आणि इतर कलाकारांनी तिला कोणतीही मदत केली नाही. भक्ती म्हणते, 'मी त्याला स्वतःकडचे ३३ लाख रुपये दिले. मला हे समजत नाही की, तो माणूस जवळजवळ मरत आहे, परंतु कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. तारक मेहता का उल्टा चष्माच्या त्याच्या टीमने गुरुचरणला फोन करून त्याच्या प्रकृतीबद्दल विचारले होते. मात्र, त्याला कोणीही आर्थिक मदत दिली नाही.'
याआधी काही महिन्यांपूर्वी गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्याने तो प्रसिद्धी झोतात आला होता. २२ एप्रिल २०२४ रोजी तो दिल्लीहून मुंबईला रवाना झाला. मुंबई विमानतळावर त्याचा मित्र त्याला घेण्यासाठी आला होता, पण तो तिथे पोहोचलाच नाही. त्याचा नंबरही बंद होता, तर त्याच्याकडून कोणतीही अपडेट देखील आली नाही. गुरुचरणचे वडील हरजित सिंह यांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तब्बल ३ आठवड्यांनंतर गुरुचरण स्वतः घरी परतला होता. गुरुचरणने दिल्ली पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले होते की, तो आध्यात्मिक प्रवासाला निघाला होता. ३ आठवड्यात त्याने अमृतसर, लुधियानासह अनेक शहरांतील गुरुद्वारांना भेट दिली. नंतर कुटुंबाच्या चिंतेने तो घरी परतला होता.'
संबंधित बातम्या