गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ओळखली जाते. या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते गुरुचरण सिंह हे गेल्या ६ ते ७ दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. दिल्ली पोलीस त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या अशा अचानक गायब होण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता मालिकेतील गोगी म्हणजे 'तारक मेहता' मधील समय शाहने गुरुचरण यांच्या बेपत्ता होण्यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांचे शेवटचे बोलणे काय झाले? हे सांगितले आहे.
समयने नुकताच 'इंडियन एक्सप्रेस'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गुरुचरण बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी केली. त्यानंतर पोलीस तपास करत असताना त्यांच्या हाती काही पुरावे लागले. तसेच त्यांना सीसीटीव्ही फूटेज देखील सापडले. २२ एप्रिल रोजी गुरुचरण दिल्लीवरुन मुंबईला निघाले होते. पण ते फ्लाइटमध्ये बसलेच नाहीत.
वाचा: अभिनेत्री जुई गडकरी हिला जेलमध्ये टाकण्याची धमकी, काय आहे नेमकी भानगड? जाणून घ्या
"मी त्यांच्याशी चार ते पाच महिन्यांपूर्वी अगदी सहज फोनवर बोललो होतो. जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ आम्ही बोलत होतो. त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मी त्यांना खूप मिस करत होतो, विशेष करुन जेव्हा आम्ही एकत्र काम करत नव्हतो त्या काळात. ते एका पंजाबी सिनेमात काम करत होते. मला फारसे त्या चित्रपटाविषयी माहिती नाही, पण त्या चित्रपटाचे नाव 'जीएस' असे काहीतरी होते" असे समय म्हणाला.
वाचा: अभिनेते महेश मांजरेकर यांच्या 'जुनं फर्निचर'ची कमाल, तीन दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
गुरुचरण बेपत्ता झाल्यानंतर ते डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले जात होते. यावर समय म्हणाला की, "आम्ही बोललो तेव्हा तरी ते खूप खूश होते. मला अजूनही विश्वास बसत नाही की लोक म्हणतात ते नैराशामध्ये होते. पण कोणाचं काही सांगू शकत नाही. आम्ही जेव्हा कधी बोलायचो तेव्हा ते खूप मजा आणि मस्ती करत असायचो. त्यांची तब्येतही बरी होती आणि ते सतत माझ्या तब्येतीची चौकशी करत बसायचे. त्यामुळे ते नैराश्यामध्ये वैगरे होते असे मला जराही वाटत नाही. मी त्यांच्यासाठी एकद सख्या मुलासारखा होतो. पण मला विश्वास आहे की ते लवकरच घरी परत येतील."
वाचा: 'आई-वडील वेगळे झाले तेव्हा मला आनंद झाला', क्षिती जोग पहिल्यांदाच पालकांच्या घटस्फोटावर बोलली
संबंधित बातम्या