Taarak Mehta Ka Ooltah Chashmah:टीव्हीचा लोकप्रिय शो'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने अनेक कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचवले. ‘जेठालाल’ उर्फ दिलीप जोशीपासून ते ‘दयाबेन’ उर्फ दिशा वकानीपर्यंत अनेक कलाकारांना चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करूनही जितकी प्रसिद्धी मिळाली नाही, तितकी प्रसिद्धी त्यांना'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधूनच मिळाली आहे. शैलेश लोढा हे देखील अशाच कलाकारांपैकी एक आहेत. शैलेश लोढा हे गेली १४ वर्षे'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये झळकत होते. ‘तारक मेहता’ या भूमिकेत अभिनेत्यालाही चाहत्यांनी खूप पसंती दिली होती.
अलीकडेच'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला १६ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र, गेल्या ३-४ वर्षांत या शोमधील अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. त्यांची जागा इतर स्टार्सनी घेतली असली, तरी प्रेक्षक आजही जुन्या कलाकारांना मिस करतात. तर, जुन्या कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत नव्या कलाकारांचं मानधन खूप कमी असल्याचं आता समोर आलं आहे.
अगदीसुरुवातीपासूनच, शैलेश लोढाने या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारली होती. आणि तो गेली १४ वर्षे या शोशी जोडला गेला होता. निर्माते असित कुमार मोदी यांच्याशी मतभेद झाल्यानंतर, शैलेशने २०२२मध्ये शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे लाखो चाहत्यांची मने तुटली.त्यानंतर अभिनेता सचिन श्रॉफ या शोमध्ये सामील झाला आणि त्याने तारक मेहताची भूमिका स्वीकारली.
शैलेश लोढा हे तारक मेहता या भूमिकेमुळे खूप लोकप्रिय झाले होते आणि त्याशिवाय ते कविता आणि लेखन क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा होते. यामुळे ते मानधन म्हणून मोठी रक्कम घेत होते. तर, निर्मातेही त्यांना ही मोठी रक्कम देऊ करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तारक मेहताची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्याला प्रत्येक एपिसोडमागे १.५ लाख रुपये फी देण्यात येत होती.
अभिनेताशैलेश लोढाने शो सोडल्यानंतर, सचिन श्रॉफने शोमध्ये'तारक मेहता' ची भूमिका साकारली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या प्रत्येक भागासाठी अवघे ३०००० रुपये मिळतात.शैलेश लोढा यांच्यापेक्षा सचिन श्रॉफला खूपच कमी मानधन दिले जात आहे. शैलेश लोढा हे या शोच्या सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक होते.
शैलेश लोढा'तारक मेहता'च्या व्यक्तिरेखेसाठी महिन्यातून फक्त काही दिवस शूटिंग करायचे. त्यांना'तारक मेहता'सोबत आणखी काही शो करायचे होते. पण,'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काम करणारा कोणताही अभिनेता दुसरा शो करू शकत नाही, हे शोच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिण्यात आले आहे. यामुळे शैलेशने शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.