Taarak Mehta Ka Ooltah Chashmah star cast Fees: गेल्या १५ वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. 'तारक मेहता...'मधील कलाकार प्रत्येक एपिसोडसाठी किती मानधन आकारतात माहित आहे का?
दिलीप जोशी: अभिनेते दिलीप जोशी हे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'जेठालाल' ही भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांना प्रत्येक एपिसोडसाठी १.५ ते २ लाख रुपये मानधन मिळते. या मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते दिलीप जोशी आहेत.
मुनमुन दत्ता: 'तारक मेहता...'मालिकेतील बबिता जी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता देखील तुफान लोकप्रिय आहे. या मालिकेत गेल्या १५ वर्षांपासून 'बबिता जी' हे पात्र साकारत आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसाठी मुनमुन दत्ताला ५०००० ते ७५००० इतके मानधन मिळते.
अमित भट्ट: अभिनेता अमित भट्ट अर्थात या मालिकेतील 'बापूजी' या पात्राला देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. 'चंपकलाल गडा'ची भूमिका साकारणाऱ्या अमित भट्ट यांना प्रत्येक एपिसोडसाठी ७००००रुपये मानधन मिळते.
सोनालिका जोशी: या मालिकेत भिडेच्या मुलीचं नाव सोनलिका असलं तरी, खऱ्या आयुष्यात त्याच्या पत्नीची 'माधवी'ची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच नाव सोनालीने जोशी आहे. 'आचार क्वीन' माधवी भिडे म्हणजेच सोनालीने जोशी प्रत्येक एपिसोडसाठी ३५००० रुपये मानधन घेते.
मंदार चांदवडकर: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'गोकुळधाम' सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे अर्थात अभिनेता मंदार चांदवडकर याला प्रत्येक एपिसोडसाठी ७०००० रुपये मानधन मिळते. मंदार आणि दिलीप जोशी हे एकमेकांचे खास मित्र आहेत.
तनुज महाशब्दे: या मालिकेत साऊथ इंडियन 'कृष्णन अय्यर'ची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्दे प्रत्यक्षात मराठी आहे. मालिकेच्या पहिल्या भागापासून काम करणाऱ्या तनुजला प्रत्येक भागासाठी ६५००० रुपये मानधन मिळते.
श्याम पाठक: 'मेरी शादी कब होगी' असं सतत म्हणणारा पोपटलाल अर्थात अभिनेता श्याम पाठक प्रत्यक्षात विवाहित असून, त्याला तीन मुलं देखील आहेत. पत्रकार पोपटलाल या भूमिकेसाठी त्याला ६०००० रुपये प्रति एपिसोड मानधन मिळते.
टप्पू सेना: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील 'टप्पू सेना'मध्ये पाच लोक आहेत. टप्पू सेना ही या शोचा अविभाज्य भाग आहे. यातील पाचही जणांना प्रत्येक एपिसोडसाठी १० ते १५ हजार रुपये मिळतात.
संबंधित बातम्या