'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील हा कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत? नाव ऐकून चाहते झाले आनंदी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील हा कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत? नाव ऐकून चाहते झाले आनंदी

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील हा कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत? नाव ऐकून चाहते झाले आनंदी

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 13, 2024 07:34 PM IST

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकार हे मालिका सोडून जाताना दिसतात. आता लवकरच एक कलाकार पुन्हा येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 तारक मेहता का उल्टा चश्मा
तारक मेहता का उल्टा चश्मा

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवरील प्रसिद्ध सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' गेल्या जवळपास १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा एक असा शो आहे जो सर्व वयोगटातील लोकांना पहायला आवडतो. या मालिकेची कथाच नाही तर त्यातील पात्रांचीही प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक कलाकार आले आणि गेले, पण गेल्यानंतरही ते चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. आता एक जुना कलाकार पुन्हा मालिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही वर्षांत अनेक प्रमुख कलाकारांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमाचा निरोप घेतला. त्याचबरोबर हा शो देखील अनेकदा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, आता या शोमधील एका लीड कलाकाराच्या पुनरागमनाची बातमी समोर येत आहे. या अभिनेत्याचे नाव ऐकून तुम्हीही आनंद होईल.

कोण आहे हा अभिनेता?

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंहला या मालिकेने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. पण काही दिवसांपूर्वी या कलाकाराने मालिका सोडली होती. आता गुरुचरण सिंह पुन्हा मालिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गुरुचरणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो शोमध्ये परतणार असण्याविषयी बोलत आहे.

जेव्हा गुरुचरणला विचारण्यात आले की तो पुन्हा तारक मेहतामध्ये दिसणार का? यावर उत्तर देत तो म्हणाला, "लोक मला विचारत आहेत की तू 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत परत येणार आहेस का? यावर माझी प्रतिक्रिया अशी आहे की, मी असित मोदींसोबत बैठक घेणार आहे. मी त्याला अजून फोन केलेला नाही, त्याने फोन केला, पण तो कशासाठी आला हे मला माहित नाही. मी त्याला नक्की फोन करेन, मी त्याला नक्की भेटेन, हे माझे कर्तव्य आहे, तो माझा निर्माता आहे आणि मी त्याच्यासोबत काम केले आहे."
वाचा: मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ

कोणाचे काम काढून घेणार नाही

गुरुचरण पुढे म्हणाला की, "आमच्यामध्ये काय चर्चा होणार याविषयी मी आता काहीच सांगू शकत नाही. मालिकेत काम करणार असे मी म्हणणार नाही किंवा मी जाणार नाही असे देखील म्हणणार नाही. मला याविषयी सध्या काहीच कल्पना नाहीये. जर देवाची इच्छा असेल तर नक्कीच मी मालिकेत दिसेन. आणखी एका गोष्टीची मला काळजी वाटते ती म्हणजे तिथे काम करणारा बल्लू. तो माझा मित्र म्हणून इथे आला होता. काही एपिसोडमध्ये तो आता काम करत आहे, त्यामुळे त्याचाही विचार करावा लागतो. कुणाचंही काम चुकता कामा नये असंही कुठेतरी मला वाटतं."

Whats_app_banner