TMKOC: बाल्कनीमध्ये बबिताजी दिसली नाही म्हणून जेठालालला आले टेन्शन, नेमकं काय झालं वाचा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: बाल्कनीमध्ये बबिताजी दिसली नाही म्हणून जेठालालला आले टेन्शन, नेमकं काय झालं वाचा

TMKOC: बाल्कनीमध्ये बबिताजी दिसली नाही म्हणून जेठालालला आले टेन्शन, नेमकं काय झालं वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Oct 03, 2024 06:41 PM IST

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील सर्वांचे २१ लाख रुपयांचे टेन्शन पूर्णपणे संपले आहे. आगामी एपिसोडमध्ये जेठालाल थोडा नाराज दिसणार आहे. खरंतर जेठालाल बबिताला बाल्कनीत दिसणार नसल्यामुळे त्याला टेन्शन आले आहे.

जेठालाल
जेठालाल

गोकुळधाम सोसायटीवरील २१ लाखांचे टेन्शन संपले आहे. सर्व मुलांना प्रत्येकी दोन लाखांचे धनादेश देण्यात आले आहेत. आता गोकुळधाममध्ये आगामी सणांची जय्यत तयारी केली जाणार आहे. मात्र, या सणांमुळे गोकुळधाममध्ये ही एक नवा तणाव निर्माण होणार आहे, जो तुम्हाला हसवणार आहे. त्याचबरोबर आगामी एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा जेठालाल बबिताला पाहण्यासाठी बाल्कनीमध्ये जातो तेव्हा ती दिसत नाही. त्यामुळे जेठालाल अस्वस्थ होतो.

मेहता साहेबांनी श्राद्धाचं महत्त्व समजावून सांगितलं

आज ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील गोकुळधाममध्ये तुम्हाला दिसेल की मेहता साहेब, पोपटलाल आणि अय्यर यांना चांगलं जेवण मिळेल. खरं तर आजच्या एपिसोडमध्ये मेहता साहेब, पोपटलाल आणि अय्यर यांच्यात श्राद्धाबद्दल झालेला संवाद पाहायला मिळणार आहे. मेहता साहेब आणि पोपटलाल श्राद्धाचे धार्मिक महत्त्व सांगतील. त्याचबरोबर अय्यर शास्त्रानुसार श्राद्धात कावळ्यांना अन्न का दिले जाते हे समजावून सांगणार आहेत.

जेठालाल झाला नाराज

जेठालालच्या दुकानात बाघा आणि जेठालाल नट्टू काकांची वाट पाहात उभे आहेत. नट्टूकाका दोन दिवसांनी आपल्या गावातून परतणार आहेत. ते जेठालाल आणि बाघासाठी गावाहून स्वादिष्ट पदार्थ घेऊन येतात. सध्या गोकुळधाममध्ये सर्व काही सुरळीत सुरू असले तरी लवकरच गोकुळधाममध्ये एक नवी समस्या निर्माण होणार आहे.

अब्दुलने जेठालालच्या त्रासाचं कारण विचारलं

येत्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिसेल की जेव्हा जेठालाल सकाळी उठल्यानंतर बाल्कीमध्ये येतो. तो बाल्कनीमध्ये येऊन सूर्याला पाणी घालत असतो. तेव्हा त्याचे लक्ष बबिताच्या बाल्कनीकडे जाते. त्याला बबिता दिसत नाही. त्यामुळे जेठालाल थोडा अस्वस्थ झाला आहे. तो बाल्कनीकडे बघत काहीतरी विचार करू लागेल. मग अब्दुल जेठालालला विचारेल काय प्रॉब्लेम आहे. पुढे तो विचारतो की, तुम्ही तिकडे बाल्कनीकडे बघून डोकं हलवत आहात नेमकी समस्या काय आहे. आता अब्दुलच्या प्रश्नाला जेठालाल काय उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
वाचा: तोंडाला रुमाल बांधलेल्या सूरजला हॉटेलमध्ये मिळत नव्हती एण्ट्री, रुमाल काढताच गर्दी जमली अन्...

दयाबेन जाणार बिग बॉस १८मध्ये?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो बिग बॉस 18 लवकरच सुरू होणार आहे. बिग बॉसचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोमध्ये कोणते सेलेब्स सहभागी होणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या नावांमध्ये दिशा वकानीचं ही नाव समोर येत आहे. काही रिपोर्ट्सनुसार, तारक मेहता शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशालाही या शोसाठी अप्रोच करण्यात आले आहे. यासाठी निर्मात्यांनी त्याला मोठ्या रकमेची ऑफरही दिली आहे.

Whats_app_banner