Munmun Dutta Viral Photo: सध्या सगळीकडे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबीता ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता आणि राज अनादकट हे दोन कलाकार चर्चेत आहेत. राजने मुनमुनशी साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर मुनमुनने प्रतिक्रिया देत या सर्व अफवा असल्याचे म्हटले. त्यापाठोपाठ आता 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर बबिताचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेतील बबिताचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या बँकग्राऊंडमध्ये पोपट लाल आणि अंजली भाजी घेताना दिसत आहेत. त्यांच्या पुढे बबिता कोणाशी तरी फोनवर हसत बोलत असते. ती फोनवर बोलताना कोणाला तरी सांगत असते की, 'हॅलो एक गूड न्यूज आहे.' बबिताचा हा फोटो शेअर करत 'बबिता जी नेमके काय बोलत आहे? लवकर कमेंट करा' असे कॅप्शन देण्यात आले आहे.
वाचा: 'तारक मेहता'मधील बबिता आणि टप्पूचा झाला साखरपुडा?
सध्या सोशल मीडियावर बबिताचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मुनमुन आणि राजची खिल्ली उडवली आहे. तर काही यूजर्सने मालिकेत दया बेन तर परत येणार नाही ना असे म्हटले आहे. हा फोटो निर्मात्यांनी नेमका का शेअर केला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: 'तो काय काम करतो हे मलाही...', सेलिब्रिटींसोबत दिसणाऱ्या ऑरीबाबत रणवीरचे वक्तव्य
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने ९ वर्षांनी लहान असलेल्या टप्पू म्हणजेच राज अनादकशी साखरपुडा केल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.मुनमुनने टाइम्स ऑफव इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'या सगळ्या अफवा आहेत आणि चुकीच्या आहेत. मी माझी उर्जा अश्या वायफळ गोष्टींवर वाया घालवत नाही.' मुनमुनच्या या वक्तव्याने साखरपुड्याच्या अफवांना पूर्णविराम देण्यात आला.
संबंधित बातम्या