हलक्याफुलक्या कथांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेच्या पात्रांची नावे लोकांच्या पसंतीस उतरली असून प्रत्येक व्यक्तिरेखेची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे. असेच एक पात्र रोशन सिंग सोढी यांचे आहे. टीव्ही अभिनेता गुरचरण सिंग ही भूमिका करायचे. पण एक दिवस अचानक त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. गुरुचरण यांनी शो का सोडला याविषयी बरीच चर्चा रंगली होती. आता मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी गुरूचरण यांचे गुपित सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
असित मोदी यांचे अचानक जाणे चाहत्यांसाठी धक्कादायक होते. २०२०मध्ये गुरूचरण सिंगने मालिका सोडली. त्यावेळी आजारपणाचे कारण देत त्यांनी मालिका सोडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. चाहते गुरूचरण लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत होते. पण आता असित मोदी जे बोलले आहेत ते लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. गुरचरण सिंग शोमधून बाहेर पडण्यामागे त्यांचे आजारपण हे कारण नाही असं असित मोदी यांनी म्हटलं आहे.
असित मोदी म्हणाले की, गुरचरण सिंग यांनी शो सोडल्यानंतरही ते त्यांच्याशी खूप भावनिकरित्या जोडले गेले होते. असित यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंबीयही असितशी खूप जोडलेले आहेत. पण मधल्या काळात या अभिनेत्याला एका प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं. टीओआय टीव्हीशी बोलताना असित मोदी म्हणाले की, निर्मात्यांनी त्यांना कधीही शो सोडण्यास सांगितले नाही. शो सोडणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि तो पूर्णपणे त्यांनी घेतला होता.
वाचा: बिग बी- शाहरुख पेक्षा जास्त हिट सिनेमे, तरीही या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली नाही
आता गुरूचरण यांना वाटत आहे की त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण त्यांना शो सोडल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली १६ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी वैयक्तिक कारणांमुळे शो सोडला आहे. त्यामुळे कोणीही कायम या शोसंबंधीत जोडले गेले नाहीत. २०२४ साली गुरचरण सिंह अचानक गायब झाल्याने चर्चेत आले होते. पण २५ दिवसांनी ते अचानक परतले आणि ध्यान करायला गेल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या