TMKOC: माझे करिअर उद्ध्वस्त केले! 'तारक मेहता...'मधील सोनूचे निर्मात्यांवर गंभीर आरोप-taarak mehta ka ooltah chashmah palak sindhwani quit the show ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: माझे करिअर उद्ध्वस्त केले! 'तारक मेहता...'मधील सोनूचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

TMKOC: माझे करिअर उद्ध्वस्त केले! 'तारक मेहता...'मधील सोनूचे निर्मात्यांवर गंभीर आरोप

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 27, 2024 04:24 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने मालिकेचा निरोप घेतला आहे. एकीकडे मालिकेचे निर्माते पलकवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलत आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्रीने तिच्यावर मानसिक छळ केल्याचा ही आरोप केला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टीव्हीवरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका गेल्या जवळपास १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथेबरोबरच त्यातील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना खूप आवडतात. ही मालिका गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. एकापाठोपाठ एक कलाकार ही मालिका सोडून जाताना दिसत आहेत. नुकताच सोनू भिडेची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने मालिकेचा निरोप घेतला आहे. एकीकडे मालिकेचे निर्माते पलकवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत बोलत आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्रीने तिच्यावर मानसिक छळ केल्याचा ही आरोप केला आहे.

पलकने निर्मात्यांवर केला छळाचा आरोप

पलक सिधवानी आणि तिच्या टीमने एक लांबलचक स्टेटमेंट जारी केले आहे. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. टाइम्स नाऊमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पलकने निर्मात्यांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीने दावा केला आहे की, १४ सप्टेंबर रोजी सेटवर तिला पॅनिक अटॅक आला होता. त्यानंतर तिला डॉक्टरकडे जावे लागले होते. पॅनिक अटॅकनंतर डॉक्टरांनी पलकला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला. असं असूनही निर्मात्यांनी तिला सीन करायला भाग पाडले.

पलक सिधवानीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, निर्मात्यांनी तिच्यावर जे काही आरोप केले आहेत ते सर्व खोटे आहेत. २०१९ मध्ये जेव्हा सोनूला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेची ऑफर देण्यात आली तेव्हा करारावर स्वाक्षरी करुन घेतली. करार वाचण्यासाठी देखील वेळ दिली नाही. अनेकदा तिने हा करार मागितला पण प्रॉडक्शन हाऊसने तो देण्यास नकार दिला.
वाचा: 'सासरचं धोतर' सिनेमामुळे दादा कोंडके यांचे पुतण्यासोबत झाले होते वाद, वाचा काय आहे प्रकरण?

निर्मात्यांनी बुडवले पलकचे पैसे

पलकने आपल्या निवेदनात असेही सांगितले की, १८ सप्टेंबर रोजी निर्मात्यांसोबत तिची बैठक झाली होती. या शोचा भाग असूनही ती जाहिरात करत असल्याने कराराचे उल्लंघन केल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत प्रॉडक्शन हाऊसने आपले सोशल मीडिया अकाऊंट बंद करून, करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त करू, अशी धमकीही दिली होती. तेव्हा पासून पलकला मानसिक धक्का बसला आहे. इतकंच नाही तर पलकच्या जबाबात सांगण्यात आले आहे की, आजपर्यंत तिला २१ लाखांपेक्षा जास्त असलेली थकबाकी देण्यात आलेली नाही. पलक सिधवानीच्या या आरोपांवर निर्मात्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेले नाही.

Whats_app_banner