TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी जेठालाल आणि गोली यांना किती मिळायचे मानधन? समोर आले आकडे
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी जेठालाल आणि गोली यांना किती मिळायचे मानधन? समोर आले आकडे

TMKOC : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या एका एपिसोडसाठी जेठालाल आणि गोली यांना किती मिळायचे मानधन? समोर आले आकडे

Jul 29, 2024 08:43 AM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत गोलीची भूमिका साकारणाऱ्या कुश शाहने आता मालिकेला ‘टाटा’ म्हटलं आहे. दरम्यान, त्याला प्रत्येक भागासाठी किती पैसे मिळायचे, हे समोर आले आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा सीरियल की स्टार कास्ट
तारक मेहता का उल्टा चश्मा सीरियल की स्टार कास्ट

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही मालिका गेल्या अनेक दशकांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. जुनी कास्ट बदलण्यापासून ते नवीन स्टारकास्ट आणण्यापर्यंत आणि अशाच काही इतर कारणांमुळे ही मालिका चर्चेत असते. नुकतेच मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी ‘गोली’ची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह ही मालिका सोडणार असल्याची पुष्टी केली होती. कुश सुरुवातीपासूनच मालिकेचा भाग बनला होता आणि मधल्या काळात काही कलाकारांनी मालिका सोडली असली तरी, तो टिकून होता. मात्र, आता त्याने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

तब्बल १६ वर्षे या शोचा भाग असलेल्या कुशला एका एपिसोडसाठी २०,००० रुपये मानधन मिळत होते. मात्र, या मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांच्यापेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. कुश शाह बऱ्याच काळापासून या मानधनावर काम करत आहे. तर, एका रिपोर्टनुसार, जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेता दिलीप जोशी या शोमध्ये एका एपिसोडसाठी १.५० लाख रुपये मानधन घेतात. मात्र, कुश आणि दिलीप यांची बॉन्डिंग अप्रतिम होती आणि ते सेटवर खूप धमाल करायचे.

Bigg Boss OTT 3: पहिली की दुसरी? युट्युबर अरमान मलिकचं कोणत्या पत्नीवर आहे अधिक प्रेम? खुद्द बायकोनेच सांगितलं सत्य!

दिलीप जोशींनी केलं कुशचं कौतुक!

दिलीप जोशी आणि कुश यांचे ट्यूनिंग असे होते की, त्यांच्या जाण्याने दिलीप जोशी भावूक झाले आणि त्यांनी सोशल मीडियावर या गोड अभिनेत्यासाठी एक पोस्ट लिहिली होती. दिलीप जोशी यांनी लिहिले की, ‘विनोदाला खूप महत्त्व आहे. मी तुमच्यासोबत प्रत्येक सीन एन्जॉय केला आहे. तुला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणत राहा. मला आशा आहे की तू बंदुकीच्या गोळीसारखा पुढे जात राहशील.’ दिलीप जोशी यांनी इन्स्टा स्टोरीवर स्वत:चा आणि गोलीचा फोटो पोस्ट केला होता.

गोलीच्या तुलनेत जेठालाल किती कमावतो?

दिलीप आणि कुशयांच्या पगाराची तुलना केली तर जेठालालची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा पगार 'गोली'पेक्षा ८६.६६ टक्के जास्त आहे. आता गोलीने हा शो सोडल्याने त्याच्यावर प्रेम करणारे सर्व चाहते निराश झाले आहेत. गोलीने हा शो का सोडला या प्रश्नाचे उत्तर अद्याप चाहत्यांना मिळालेले नाही. पण, वैयक्तिक कारणांमुळे किंवा भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन त्याने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा निरोप घेतल्याचे समजते. तर, काही रिपोर्ट्सनुसार तो उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Whats_app_banner