Bigg Boss: 'तारक मेहता'मधील ‘हा’ कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात? नाव ऐकून व्हाल चकीत-taarak mehta ka ooltah chashmah fem munmun dutta will be a part of bigg boss 18 ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss: 'तारक मेहता'मधील ‘हा’ कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात? नाव ऐकून व्हाल चकीत

Bigg Boss: 'तारक मेहता'मधील ‘हा’ कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात? नाव ऐकून व्हाल चकीत

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 12, 2024 07:50 PM IST

Bigg Boss: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील एका कलाकाराला 'बिग बॉस'ची ऑफर आली होती. आता हा कलाकार कोणता चला जाणून घेऊया...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

बिग बॉस ओटीटी ३ नंतर आता प्रत्येकजण 'बिग बॉस १८'च्या सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खानला पुन्हा एकदा होस्टच्या रुपात पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या शोबद्दल सतत नवनवीन अपडेट्स येत असतात. आतापर्यंत या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, आणखी एक नाव समोर येत आहे. हे नाव ऐकून तुम्हाला आनंद होणार आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील एका कलाकाराली देखील विचारण्यात आले आहे. आता हा कलाकार कोणता चला जाणून घेऊया...

कोण आहे तो कलाकार?

सलमान खानच्या 'बिग बॉस १८' या शोबाबत एक मोठं अपडेट समोर येत आहे. शोमध्ये जाण्याबाबत आणखी एक नाव समोर येत आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताला 'बिग बॉस १८'मध्ये जाण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. मुनमुनचं नाव समोर येताच चाहते खूप खूश झाले आहेत. सध्या मुनमुनकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

आणखी कोणते कलाकार दिसणार?

'बिग बॉस १८' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे कोणते कलाकार सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुनमूननंतर विशाल पांडे आणि लवकेश कटारिया यांची नावेही 'बिग बॉस १८'साठी चर्चेत आहेत. शोसाठी फायनलिस्ट म्हणून या दोघांची नावे देखील घेतली जात आहेत. real_itycast पेजवर नुकताच दोघांचे फोटो शेअर करत या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, अद्याप निर्माते किंवा विशाल आणि लुकेशने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
वाचा: रणवीर सिंगनंतर अभिनेत्रीने केले अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट, नेटकऱ्यांनी केली जोरदार टीका

कोणत्या नावांची चर्चा

'बिग बॉस १८' या रिअॅलिटी शोमध्ये दीपिका आर्य, निश्चय मल्हान, शोएब इब्राहिम, डॉली चायवाला, मुनमून दत्ता, विशाल पांडे आणि लवकेश कटारिया या नावांची सध्या चर्चा आहे. आता हा रिअॅलिटी शो सुरु झाल्यावरच कोणते कलाकार दिसणार हे स्पष्ट होईल.

‘बिग बॉस ओटीटी ३’ विजेता

बिग बॉस ओटीटीच्या घरात १६ स्पर्धकांनी प्रवेश केला होता. या यादीत सना मकबूल, साई केतन, नेझी, रणवीर शौरी आणि कृतिका मलिक, लवकेश कटारिया, अरमान मलिक, विशाल पांडे, शिवानी कुमारी, नीरज गोयत, पायल मलिक, मुनीषा खटवानी, चंद्रिका दीक्षित, पाउलोमी दास, दीपक चौरसिया, सना सुलतान यांचा समावेश होता. त्यामधील सना मकबूलने ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले.