छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा'मध्ये रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंह हा बेपत्ता झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून गुरुचरण सिंह बेपत्ता असल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्याच्या वडिलांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या गुरुचरण सिंहचा शोध घेत आहेत.
गुरुचरण सिंहच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी नुसार, ५० वर्षीय गुरुचरण सिंह विमानाने दिल्लीहून मुंबईला निघाले होते. सकाळी ८.३० मिनिटांनी ते घरातून निघातले. पण गुरुचरण मुंबईला पोहोचले नाहीत किंवा घरी गेललेले नाहीत. गेल्या चार दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे. गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
वाचा: थिएटरमधील चित्रपटात आता जाहिरातींचा अडथळा नाही! पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?
गुरुचरण सिंह बेपत्ता झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वडिलांसोबतच्या फोटोंचे कोलाज करुन व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी 'Divine Birthday to Father' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: ट्रेंडमध्ये असलेले 'गुलाबी साडी' हे गाणे कोणी गायले आणि कसे सुचले माहिती आहे का? जाणून घ्या
गुरुचरण हे दिल्लीवरुन मुंबई यायला निघाले होते. ते मुंबई विमानतळावर तर पोहोचले. पण घर तेथून ते कुठे गेले हे कळाले नाही. त्याची फॅमिली फ्रेंड भक्ती सोनी त्यांना घेण्यासाठी मुंबई विमानतळावर गेली होती. पण तिला ते कुठेच सापडले नाही. तिने एअरपोर्ट अथॉरिटीशी संपर्क केला तेव्हा त्यांना कळाले की ते विमानात चढलेच नाहीत. पण फ्लाइटमध्ये चढण्याआधी गुरुचरण यांनी भक्तीला मेसेज करुन फ्लाइटमध्ये बोर्ड होत असल्याचा मेसेज केला होता. त्यामुळे ते गेले कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: पोझ देत असताना जोरात वारा आला अन्...; ऊप्स मोमेंटची शिकार झाली हृतिकची पूर्व पत्नी सुझान खान
गुरुचरण बेपत्ता झाल्याचे कळताच दिल्ली पोलिसांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आहे. या प्रकरणी सध्या तपास सुरु केला असून गुरुचरण यांचा फोन ट्रेस केला जात आहे. जेणेकरुन ते शेवटी गेले होते याबाबत माहिती समोर येईल.