छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील सोढी म्हणजेच गुरुचरण सिंह हे गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत असून अद्याप त्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यांनी स्वत:च स्वत:ला किडनॅपिंग केल्याचे षडयंत्र रचल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, अद्याप त्यांचा पत्ता लागला नसल्यामुळे चाहते चिंतेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता गुरुचरण यांच्या वडिलांनी आदल्या दिवशी नेमके काय झाले होते हे सांगितले आहे.
गुरुचरण यांचे वडील हरगीत सिंह यांनी ई-टाइम्सशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, 'जे काही झाले आहे ते खूपच धक्कादायक आहे. या सगळ्याचा सामना कसा करायचा हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला चिंता वाटत आहे आणि पोलिसांकडून काहीतरी अपडेट येईल याची वाट पाहात बसलो आहे. आम्हाला माहिती आहे गुरुचरण परत येईल. आम्ही त्याची वाट पाहात आहोत.'
वाचा: 'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल
हरगीत सिंह म्हणाले की, 'तो बेपत्ता होण्याच्या आदल्या दिवशी माझा वाढदिवस होता. आम्ही सगळे एकत्र होतो, तो घरी आला होता. पण आम्ही काहीच सेलिब्रेशन केले नव्हते. आम्ही केवळ एकत्र होतो आणि आनंदी होतो. दुसऱ्या दिवशी गुरुचरण मुंबईला जायला निघणार होता. आणि हे सगळं असं होऊन बसलय.'
वाचा: ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका
गुरुचरण सिंह गायब झाल्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत गुरुचरण यांच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांनी चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री, अभिनेता सयम शाह आणि मंदार चांदवडकर या कलाकारांनी गुरुचरण बेपत्ता होताच चिंता व्यक्त केली आहे. तो लवकरच घरी परत येईल आणि सर्वकाही ठीक होईल असे त्याने म्हटले आहे.
वाचा: 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत गुरुचरण सिंह हा रोशन सोढीच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले होते. तसेच या त्याच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. पण २०२०मध्ये गुरुचरण यांनी काही कारणास्तव मालिकेला रामराम ठोकला. त्यांची जागी अभिनेता बलविंदर सिंग सूरी या मालिकेत दिसत आहे.
संबंधित बातम्या