छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका पाहिली जाते. या मालिकेत जेठालाल हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे भलतेच लोकप्रिय आहेत. खऱ्या नावापेक्षा दिलीप जोशी हे जेठालाल चंपकलाल गाडा या नावाने विशेष ओळखले जातात. आज दिलीप जोशी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
दिलीप जोशी यांचा जन्म २६ मे १९६८ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. दिलीप यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी मालिकेतून तुफान प्रसिद्धी मिळाली आहे. एका दशकाहून अधिक काळ चालणारा हा कॉमेडी शो काळानुसार अधिक लोकप्रिय होत आहे. यातील कलाकारांनाही प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.
वाचा: उफ्फ ये अदाये! अमृता खानविलकरने मुंबई पोलिसांसाठी असे का म्हटले? नेमकं काय आहे प्रकरण
दिलीप जोशी हे आज प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेते आहेत. टीव्हीशिवाय त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. आजघडीला दिलीप जोशी यांच्याकडे पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी आहेत. मात्र, काही वर्षापूर्वी त्यांचे आयुष्य असे नव्हते. आता एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेणारे दिलीप जोशी त्याकाळी पडेल ते काम करायला तयार होते.
वाचा: ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोरबंदरच्या ग्रामीण भागात जन्मलेल्या दिलीप जोशी यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. यासाठी त्यांना रोज फक्त ५० रुपये मिळत होते. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर दिलीप जोशी जेव्हा मुंबईत पोहोचले, तेव्हा त्यांनी काम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. १९८९मध्ये सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर फिल्म ‘मैंने प्यार किया’ मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी रामू नावाच्या पात्राची छोटीशी भूमिका साकारली होती.
वाचा: मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर
दिलीप जोशी यांना या चित्रपटानंतर काम मिळू लागले. 'हमराज', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'खिलाडी ४२०' सारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले. यादरम्यान ते टीव्ही शोमध्येही नशीब आजमावत राहिले. पण दिलीप जोशींना खरी ओळख मिळाली ती २००८मध्ये सुरू झालेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' यामालिकेमध्ये ‘जेठालाल’ ही भूमिका साकारल्यामुळेच! या मालिकेने त्यांचे नशीबच पालटले. दिलीप जोशी हे या शोचे सर्वात लाडके कलाकार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी ‘जेठालाल’ची भूमिका साकारण्यासाठी प्रति एपिसोड १.५ ते २ लाख रुपये घेतात. दिलीप यांची एकूण संपत्ती २० कोटींहून अधिक आहे.