मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पैसा आणि प्रसिद्धी मिळत असतानाही ‘तारक मेहता...’च्या 'टप्पू'ने का सोडली मालिका? समोर आलं खरं कारण

पैसा आणि प्रसिद्धी मिळत असतानाही ‘तारक मेहता...’च्या 'टप्पू'ने का सोडली मालिका? समोर आलं खरं कारण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 20, 2024 08:30 AM IST

टीव्ही अभिनेता राज अनादकतने नुकताच खुलासा केला की, त्याने प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' का सोडला?

पैसा आणि प्रसिद्धी मिळत असतानाही ‘तारक मेहता...’च्या 'टप्पू'ने का सोडली मालिका? समोर आलं खरं कारण
पैसा आणि प्रसिद्धी मिळत असतानाही ‘तारक मेहता...’च्या 'टप्पू'ने का सोडली मालिका? समोर आलं खरं कारण

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील ‘टप्पू’च्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेल्या राज अनादकतने काही महिन्यांपूर्वीच हा शो सोडला आहे. पण, तो व्लॉग्सच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी नेहमीच कनेक्टेड राहतो. नुकत्याच एका व्लॉगद्वारे राजने त्याच्याबद्दल सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या किंवा शोधले गेलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामध्ये त्याने शो सोडण्याचे कारण देखील सांगितले आहे. टप्पू म्हणून आपला प्रवास कसा सुरू झाला याचाही उल्लेख त्याने केला आहे. त्याला दोनदा 'बिग बॉस'ची ऑफर मिळाली होती. मात्र, त्याला त्यात जायचे आहे की नाही, हे इतक्यात सांगू शकत नाही, असे राज यावेळी म्हणाला.

ट्रेंडिंग न्यूज

टीव्ही अभिनेता राज अनादकतने यावेळी खुलासा केला की, त्याने प्रसिद्ध टेलिव्हिजन शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' का सोडला? या शोमध्ये राज अनादकत दिलीप जोशी अर्थात जेठालाल यांचा मुलगा टप्पूची भूमिका साकारत होता. तब्बल पाच वर्षे तो या शोचा भाग होता. मात्र, त्याने डिसेंबर २०२२मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोडण्याची घोषणा केली आहे. आता २०२४मध्ये राज अनादकतने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला, ज्यामध्ये त्याने त्याच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

गोळीबार प्रकरणानंतर दुबईत पोहोचलेला सलमान खान एन्जॉय करतोय बेली डान्स! सोशल मीडियावर Video Viral!

का सोडली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका?

या वेळी जेव्हा एका सोशल मीडिया वापरकर्त्याने राज अनादकतला असित कुमार मोदीचा शो सोडण्यामागचे कारण विचारले, तेव्हा राज अनादकतने खुलासा केला की, त्याने हा निर्णय घेतला कारण, त्याला एक अभिनेता म्हणून आणखी पुढे जायचे होते. राज अनादकत म्हणाला की, ‘मी हा शो पाच वर्षे केला आणि या शोसाठी मी १०००हून अधिक एपिसोड केले. हा प्रवास माझ्यासाठी खूप सुंदर होता, पण एक अभिनेता म्हणून मला या क्षेत्रात आणखी प्रगती करायची होती. मला वेगवेगळ्या पात्रांचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि या संधीसाठी मी देवाची नेहमीच ऋणी आहे. मला टप्पू म्हणून स्वीकारल्याबद्दल सर्वांचे आभार. आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात.’

कसा होता 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मालिकेचा अनुभव?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' बद्दल बोलत असताना, राज अनादकत याने मालिकेतील त्याचा प्रवास एक अद्भुत अनुभव असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, ‘जर मला माझ्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील प्रवासाचे एका शब्दात वर्णन करायचे असेल तर मी त्याला 'वंडरफुल', 'माइंडब्लोइंग' आणि 'अमेझिंग' असे म्हणेन. या शोमधून मला खूप काही शिकायला मिळाले. अनेक चढउतार आले. आम्ही हसलो, रडलो आणि खूप मजा केली. माझी पहिली परदेशवारीही याच शोमुळे झाली. या मालिकेच्या शूटिंगसाठी आम्ही सिंगापूरला गेलो होतो.’

IPL_Entry_Point