Jheel Mehta Wedding Preparation: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारून घराघरांत लोकप्रिय झाली अभिनेत्री झील मेहता आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. झील मेहताच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अभिनेत्री झील मेहता हिने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर काही फोटो शेअर करून याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. नुकताच दोघांचा रोका सोहळा पार पडला आहे. या फोटोंमध्ये झील मेहता हिने आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सोहळ्यामध्ये झील आणि तिच्या होणाऱ्या पतीने मॅचिंग आउटफिट घातले होते.
या खास प्रसंगी या जोडीने निळ्या रंगाचे आउटफिट्स घातले होते. या खास सोहळ्याचे फोटो झीलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तो तिच्या होणाऱ्या पतीसोबत आणि सासऱ्यांसोबत फोटो पोज देताना दिसत आहेत. झील मेहता हिने सुंदर निळ्या रंगाचा लेहेंगा सेट परिधान केला आहे. यासोबतच तिने मॅचिंग दुपट्टा कॅरी केला होता. एका स्टेटमेंट नेकलेससह तिने तिचा हा लुक ऍक्सेसरीझ केला होता. यासोबतच तिने अतिशय हलका आणि आपल्या लूकला शोभून दिसेल असा मेकअप केला होता. विशेष म्हणजे हा मेकअप तिने स्वतः केला होता.
आपले हे खास फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक नवीन सुरुवात #LoveAJkal आणि एक नव्या कुटुंबासोबतचा फोटो. आमच्या कुटुंबियांच्या उपस्थित झालेल्या एका छोट्याशा समारंभासाठी मी स्वतः मेकअप केला आहे!’ यासोबतच तिने ‘ब्राईड टू बी’, ‘इंडियन वेडिंग’ हे हॅशटॅग वापरले आहेत. लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सोनू’च्या भूमिकेत झळकलेल्या झील मेहता हिने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रियकर आदित्यसोबतच्या आपल्या नात्याची जाहीर कबुली देत एंगेजमेंट केली होती. इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून झीलने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती.
अभिनेत्री झील मेहता हिने २००८पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये सोनालिका आत्माराम भिडे अर्थात सोनूची भूमिका केली होती. मात्र, नंतर तिने या शोमधून काढता पाय घेत आपल्या अभ्यासवर लक्ष केंद्र केले होते. तिने २०१२मध्ये हा शो सोडला आणि ती एक मेकअप आर्टिस्ट बनली. सध्या झील मेहता आणि तिची आई मेकअप बिझनेस करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना मेकअपचे धडे देत असतात.
संबंधित बातम्या