Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Gurucharan Singh: टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेई १४ वर्ष यान मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अशा तऱ्हेने मालिकेची कथाच नव्हे, तर त्यातील पात्रांनीही प्रेक्षकांमध्ये आपलं खास स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वी ही मालिका जुन्या ‘रोशन सिंह सोढी’ची भूमिका साकारणाऱ्या गुरचरण सिंहमुळे चर्चेत होती. ‘तारक मेहता’ या मालिकेत ‘सोढी’ साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता गुरचरण सिंह यावर्षी एप्रिलमध्ये बेपत्ता झाला होता.
२२ एप्रिल रोजी तो दिल्लीहून मुंबईला जाणार होता. पण तो विमानात चढलाच नाही आणि बेपत्ता झाला. बेपत्ता झाल्यापासून २४ दिवसांनंतर तो घरी परतला. या दरम्यान पोलीस आणि अभिनेत्याचे कुटुंबीय त्याला शोधत होते. मात्र, परतल्यावर त्याने आपण आध्यात्मिक प्रवासाला गेलो होतो, असे म्हटले. अशातच गुरुचरणबाबत पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे, जी ऐकून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसू शकतो.
गुरुचरण सिंह यांची जवळची मैत्रीण सोनी यांनी ‘टाइम्स नाऊ/टेलिटॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंह यांच्याबद्दल बरेच काही सांगितले आहे. यात त्यांनी म्हणते की, अभिनेता गुरचरण सिंह आता कायमस्वरूपी दिल्लीत स्थायिक होणार आहे. त्याच्या आई-वडिलांना त्याच्यासोबत मुंबईला जायचं होतं, पण ते आता खूप वयस्कर झाले आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईत राहण्यास खूप त्रास होणार होता. त्यामुळे आता खुद्द अभिनेत्याने मुंबई सोडून दिल्लीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गुरुचरण सिंग पूर्णपणे निरोगी आहेत. त्याच्या आई-वडिलांची इच्छा असल्याने, ते लवकरच दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. सोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुरुचरणसोबतची एक पोस्ट देखील शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. यावर चाहते कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
अभिनेता गुरचरण सिंह २००८ ते २०१३ दरम्यान 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा भाग होता. या शोसंदर्भात निर्माते असित मोदी यांच्याशी संबंधित वादांमुळे त्यांने हा शो सोडला होता. मात्र, प्रेक्षकांमध्ये अभिनेत्याची लोकप्रियता कमालीची होती. त्यामुळे निर्मात्यांनी त्याला पुन्हा शोमध्ये बोलावले. परंतु, २०२०मध्ये त्याने पुन्हा शो सोडला. वडिलांचा सांभाळ करण्यासाठी गुरुचरणने दुसऱ्यांदा शो सोडला, असं म्हटलं गेलं. त्यावेळी त्याच्या वडिलांवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्याच्या आईची तब्येत ठीक नव्हती. म्हणूनच तो करिअर सोडून घरी परतला. तर, त्याने मुंबई सोडून कायमस्वरूपी दिल्लीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या