मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ला मिळाला खऱ्या आयुष्यातला ‘टप्पू’! व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या ‘सोनू’ला मिळाला खऱ्या आयुष्यातला ‘टप्पू’! व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 03, 2024 03:56 PM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta:अभिनेत्री झील मेहता हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fame Jheel Mehta:तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये ‘सोनू’च्या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री झील मेहता आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे.खुद्द अभिनेत्रीनेच या वृत्ताला मान्यता दिली आहे.अभिनेत्री झील मेहता हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.या व्हिडीओमध्ये झील मेहताचा बॉयफ्रेंड तिला लग्नासाठी प्रपोज करताना दिसला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आता सोनूला टप्पू मिळाल्याचे म्हणत आहेत.

अभिनेत्री झील मेहता हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू झाली तेव्हापासून पुढील अनेक वर्ष ती या मालिकेचा भाग होती. मात्र, नंतर तिने या मालिकेतून ब्रेक घेऊन आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. झील मेहता हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडल्यानंतर तिची जागा अभिनेत्री निधी भानुशाली हिने घेतली होती. यानंतर झीलने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला होता. आता झील मेहता तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

Moye Moye Video Viral: मित्राचं लग्न लागताच सगळे म्हणाले ‘मोये मोये’; व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले!

झील मेहता हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, झीलला डोळ्यावर पट्टी बांधून एका ठिकाणी आणलं जातं, जेव्हा तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढली जाते, तेव्हा दिसतं की लग्नाच्या प्रस्तावासाठी हा सेटअप आहे. यानंतर झीलचा बॉयफ्रेंड तिच्यासाठी अतिशय क्युट स्टाईलमध्ये परफॉर्म करतो. यादरम्यान झील आनंदाने भावूक होताना दिसत आहे. ती तिच्या बॉयफ्रेंडला मिठी मारतानाही दिसत आहे. दोघांना एकत्र पाहून दोघेही खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत असल्याचे लक्षात येते. यानंतर हे कपल त्यांच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. प्रत्येकजण या क्षणाचा मनापासून आनंद घेत आहे.

आता अभिनेत्री झील मेहताची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रील टप्पू म्हणजेच अभिनेता भव्य गांधी यानेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. त्याने या व्हिडीओवर हार्ट इमोजी शेअर केला आहे. आता झील मेहताचे लग्न कधी होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीने अद्याप तिच्या लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही.

WhatsApp channel