TMKOC Fame Gurucharan Singh : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ चा ‘रोशन सिंह सोढी’ म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला दिसत आहे आणि व्हिडिओत बोलत असताना तो खूप भावूक होताना दिसत होता. ‘रोशन सिंह सोढी’ या पात्रामुळे प्रसिद्ध असलेला अभिनेता गुरुचरण सिंह हा सध्या आजारी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने त्याला भरपूर लोकप्रियता मिळाली होती. आता अभिनेत्याने गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.
अभिनेत्याने आपल्या व्हिडिओत म्हटले की, देवाने त्याला नवीन जीवन दिले ज्यासाठी तो देवाचा आभारी आहे. अभिनेत्याने या व्हिडिओत रुग्णालयात दाखल होण्याचे कारण दिलेले नाही, मात्र त्याची प्रकृती पाहून चाहते खूपच काळजीत पडले आहेत.
अभिनेता गुरुचरण सिंहने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या हातात सलाईन लावलेली दिसते आहे. यावेळी तो म्हणतो की, ‘परिस्थिती फार वाईट झाली आहे. आता मला काय झाले आहे, हे लवकरच सांगेन’, असे तो म्हणाला. याशिवाय त्याने चाहत्यांना गुरुपर्वच्या शुभेच्छा दिल्या.
त्याच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी इच्छा त्याच्या चाहत्यांची व्यक्त केली आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘गुरु पर्व निमित्त, गुरू साहिब जींनी मला नवीन जीवनाचा आशीर्वाद दिला. गुरु साहिब जींचे अनंत आणि अमर्याद आभार. मी सुद्धा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि आदर व्यक्त करतो. गुरू साहिब द्वारे, देवाच्या कृपेने मी आज जिवंत आहे आणि तुमच्यासमोर उभा आहे, तुम्हा सर्वांचे आभार आणि वाहेगुरु तुम्हाला आशीर्वाद देत राहोत.’
त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहते काळजीत पडले आहेत. एका युजरने लिहिले की, 'मी तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.' दुसऱ्या युजरने कमेंट केली, ‘सर लवकर बरे व्हा.’ काही महिन्यांपूर्वी हा अभिनेता बेपत्ता झाल्यामुळे चर्चेत आला होता. बेपत्ता झाल्यानंतर सुमारे २५ दिवसांनी तो घरी परतला. यानंतर तो कामाच्या शोधात होता. त्यानंतर ‘तारक मेहता..’ मालिकेत त्याचे पुनरागमन होईल, असे म्हटले जात होते. मात्र, अद्याप असित मोदींशी चर्चा न झाल्यामुळे हे प्रकरण तिथेच अडकले आहे.
संबंधित बातम्या