मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Munmun Dutta Engagement: ९ वर्षांनी लहान असणाऱ्या ‘टप्पू’सोबत साखरपुडा केला? अखेर ‘बबिता जीं’नी खरं सांगितलं!

Munmun Dutta Engagement: ९ वर्षांनी लहान असणाऱ्या ‘टप्पू’सोबत साखरपुडा केला? अखेर ‘बबिता जीं’नी खरं सांगितलं!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 14, 2024 09:46 AM IST

Munmun Dutta And Raj Anadkat Engagement: मालिकेत ‘टप्पू’ची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत याच्याशी मुनमुन दत्ताने साखरपुडा केल्याचे बोलले जात होते. मात्र, या सगळ्यावर आता स्वतः मुनमुनने प्रतिक्रिया दिली आहे.

Munmun Dutta And Raj Anadkat Engagement
Munmun Dutta And Raj Anadkat Engagement

Munmun Dutta And Raj Anadkat Engagement News:  १४ वर्षांपासून छोट्या पडद्यावर कल्ला करणारी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यावेळी मालिका चर्चेत येण्याचे कारण मालिकेचे कथानक नसून, यातील कलाकार आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘बबिताजी’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आता एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली असून, तिने साखरपुडा केल्याचे नुकतेच समोर आले होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘टप्पू’ची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकत (Raj Anadkat) याच्याशी मुनमुन दत्ताने साखरपुडा केल्याचे बोलले जात होते. मात्र, या सगळ्यावर आता स्वतः मुनमुनने प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि अभिनेता राज अनादकट यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर चांगलीच हवा निर्माण केली आहे. राज अनादकत हा २७ वर्षांचा असून, मुनमुन दत्ता ही ३६ वर्षांची असल्याने दोघांमध्ये नऊ वर्षांचे मोठे अंतर आहे. आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत साखरपुडा केल्याच्या चर्चेमुळे मुनमुन दत्ताला ट्रोल देखील केले जात होते. मात्र, बऱ्याच चर्चा झाल्यानंतर आता मुनमुन दत्ता हिने स्वतः समोर येऊन, या मागचे सत्य सांगितले आहे.

वाचा: Rohit Shetty Birthday: आपल्याच चित्रपटाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता रोहित शेट्टी; अधुरी राहिली कहाणी!

नेमक्या अफवा काय?

गेल्या काही काळापासून मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, मुनमुन दत्तांनी नेहमीच या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. या दरम्यान दोघांनी कुटुंबाच्या उपस्थितीत साखरपुडा उरकल्याचे बोलले जात होते. दोघांच्या कुटुंबांनी त्यांच्या या नात्याला मान्यता दिली असून, आता या दोघांनी एकत्र पुढचे पाऊल टाकले असल्याचे म्हटले जात होते. कुटुंबाच्या उपस्थितीत गुजरातमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता मुनमुन दत्ता हिने माध्यमांना मुलाखत देत, या सगळ्या चर्चांवर स्पष्टीकरण देऊन सत्य काय आहे हे सांगितले आहे.

मुनमुन दत्ता म्हणते...

साखरपुड्याच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर ट्रोल झालेल्या मुनमुन दत्ताने माध्यमांशी संवाद साधला. एका वेब पोर्टलशी बोलताना मुनमुन दत्ता म्हणाली की, ‘या सगळ्या बातम्या निव्वळ अफवा आहेत. अशा अफवांवर आणि खोट्या बातम्यांवर मला माझा वेळ फुकट घालवायचा नाही. या अशा अफवा सतत उडतच असतात, त्यावर प्रतिक्रिया देऊन आपला वेळ फुकट घालवण्यात काहीही अर्थ नसतो.’ मुनमुन दत्ताच्या या वक्तव्यामुळे आता तिचा आणि राज अनादकतचा साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

IPL_Entry_Point