Jheel Mehta Wedding : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोमध्ये ‘सोनू’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता विवाहबंधनात अडकली आहे. झीलने तिच्या लॉन्ग टाइम बॉयफ्रेंडसोबत सात फेऱ्या घेतल्या, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती वधूच्या रुपात दिसत आहे. अभिनेत्रीने लाल रंगाचा लेहंगा आणि दागिने घालून आपला लूक पूर्ण केला आहे. या लग्नात तिची झालेली ग्रँड एन्ट्री चाहत्यांना आवडत आहे. झील समोरून येत आहे आणि तिच्यासमोर आदित्य येतो. आपल्या जिवलग मैत्रिणीला आणि प्रेमाला वधू रूपात समोर बघून आदित्य आपले अश्रू रोखू शकत नव्हता.
झील मेहता हिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘सोनू भिडे’ ही भूमिका साकारताना दिसली होती. मात्र, नंतर तिने करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ती नेहमीच सगळ्या कलाकारांच्या संपर्कात होती. तिने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या संपूर्ण टीमला लग्नाचे आमंत्रण दिले होते. मात्र, या मालिकेत तिच्या वडिलांची भूमिका साकरणाऱ्या ‘आत्माराम भिडे’ अर्थात अभिनेता मंदार चांदवडकर याला लग्नाला उपस्थित राहता आले नाही. याबद्दल त्याने सोनूची माफी देखील मागितली. शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याला या लग्नाला उपस्थित राहता आलेले नाही. त्याने आपल्या या ऑन स्क्रीन लेकीला खूप खूप शुभेच्छा देखील दिल्या.
अभिनेत्री झील मेहता गेल्या १४ वर्षांपासून आदित्य दुबेला डेट करत होती. गतवर्षाच्या सुरुवातीलाच आदित्यने प्रपोज करून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. वर्षाच्या अखेरीस दोघांनी लग्न केले. या लग्नाला कुटुंबीय आणि काही खास मित्र मंडळी उपस्थित होती. ग्रँड फंक्शनमध्ये दोघांनी एकमेकांसोबत सात फेरे घेतले. झीलने तिच्या हळदी आणि मेहंदीचे फोटोही शेअर केले आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये झील मेहता ‘सोनू’च्या भूमिकेत दिसला होता. टप्पूच्या सेनेतील सोनू तिच्या भूमिकेत चांगलाच आवडला होता. पण गेल्या काही काळापासून तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. मध्यंतरीच्या काळात ती बिझनेसवुमन बनली आहे. झील तिच्या कामाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. आदित्यही तिला त्याला या कामात मदत करतो.
संबंधित बातम्या