छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'तारक मेहता का उल्टा चश्मा' पाहिली जाते. या मालिकेतील कलाकार आणि निर्माते यांच्यामधील वाद हे जगजाहीर आहेत. आता मालिकेतील जेठालाल आणि असित मोदी यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र दिलीप जोशी यांनी निर्माते असित मोदी यांच्याशी भांडण झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. ही बातमी खोटी असून शोचा हेवा वाटणारे ती पसरवत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मालिकेशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीसाठी दोघांमध्ये भांडण झाले होते. दिलीपने असितची कॉलर पकडली असे देखील म्हटले जात होते.
दिलीप जोशी यांनी टाइम्स नाऊला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये, 'मला पसरत असलेल्या अफवा दूर करायच्या आहेत. माझ्याबद्दल आणि असित भाईंबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या काही बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत. अशा गोष्टी बोलल्या जात आहेत याबद्दल मला खेद वाटतो. दुर्दैवाने नकारात्मकता पसरवली जात आहे. तेही अशा गोष्टीसाठी ज्यामुळे मला इतकी वर्षे आनंद झाला. दरवेळी एखादी अफवा पसरली की ती पूर्णपणे चुकीची असल्याचं आपण सतत समजावून सांगत असतो. आम्ही थकलो आहोत आणि निराश झालो आहोत. कारण हे फक्त आमच्याबद्दल नाही तर सर्व चाहते आहेत ज्यांना हा शो आवडतो आणि हे सर्व वाचून ते अस्वस्थ होताता' असे दिलीप जोशी म्हणाले.
पुढे दिलीप जोशी म्हणाले, 'याआधीही मी शो सोडत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, ज्या पूर्णपणे खोट्या होत्या. आता असे दिसते की दर काही आठवड्यांनी एक नवीन कथा असित भाईला कोणत्या ना कोणत्या प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेकदा शोच्या सततच्या यशाच्या ईर्षेपोटी लोक हे करत आहेत की नाही हे समजत नाही. या सर्व कथा पसरवण्यामागे कोण आहे माहित नाही, मला एवढेच म्हणायचे आहे की हा मीच आहे. कुठेही न जाता मी रोज तितक्याच प्रेमाने आणि मनापासून हा शो करत आहे. या सुंदर प्रवासाचा मी इतका काळ भाग आहे आणि यापुढेही यासोबत जोडला राहणार आहे.'
वाचा: चार वर्षांनी मायदेशी परतलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे व्यवसायात पदार्पण, मुंबईत सुरू केले रेस्टॉरंट
न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, या शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले होते की, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात ऑगस्टमध्ये भांडण झाले होते. दिलीपला विश्रांती हवी होती आणि असित त्याबद्दल बोलत नव्हता. रागाच्या भरात दिलीप जोशी यांनी त्यांची कॉलर पकडली.