Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर नवा आरोप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर नवा आरोप

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: प्रेग्नंट असताना शोमधून काढलं! जेनिफर मिस्त्रीचा असित मोदींवर नवा आरोप

Published Jun 04, 2023 10:22 AM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Controversy: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफर मिस्त्री बन्सीवालने खुलासा केला की, तिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल निर्मात्यांना सांगताच तिला या शोमधून बाहेर काढण्यात आले होते.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Controversy
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Controversy

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Controversy: तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात अडकली आहे. या मालिकेतील अनेक कलाकारांनी निर्माता असित कुमार मोदी याच्यावर काही आरोप केले आहेत. असित मोदींवर लैगिक शोषणाचा आरोप करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री-बन्सीवाल हिने आता आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या आधी तिने शोचा निर्माता असित मोदीसह निर्मितीशी संबंधित आणखी दोन लोकांवर शोषणाचा आरोप केला होता. आपल्या नव्या मुलाखतीत जेनिफरने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. नव्या मुलाखतीत जेनिफरने सांगितले की, आयुष्यातील शेवटच्या घटका मोजत असलेल्या तिच्या भावाला भेटायला जाण्याची परवानगी देखील तिला नाकारण्यात आली होती. तसेच, या लोकांकडून अभिनेता घनश्याम नायक उर्फ ‘नट्टू काकां’चा छळ केला जात होता, असा दावा तिने केला आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेनिफर मिस्त्री बन्सीवालने खुलासा केला की, तिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल निर्मात्यांना सांगताच तिला या शोमधून बाहेर काढण्यात आले होते. अभिनेत्रीने सांगितले की, या घटनेच्या ३ वर्षांनी ती पुन्हा शोमध्ये परतली. मात्र, त्याचवेळी तिच्या सहकलाकाराने हा शो सोडला. यासाठी तिने निर्मात्यांना आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

Neena Gupta birthday: प्रेग्नंट नीना गुप्ताला सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी! वाचा किस्सा...

याचा खुलासा करताना जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिने पिंकविलाला सांगितले की, ‘२०१३मध्ये मी गरोदर होते आणि म न सांगताच माझी भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीला दिली. त्यांनी माझी जागा हिरावून घेतली. मी शो सोडल्याचे त्यांनीच सर्वांना सांगितले. काही लोकांना वगळून कलाकार आणि क्रू यांनाही हे माहीत नव्हते की, मी शो सोडला नाही, तर मला काढून टाकण्यात आले होते.’

जेनिफर म्हणाली की, ‘मी प्रेग्नंट होते, गुरचरण सिंह सोढीने शो सोडला होता. त्यामुळे मला सांगण्यात आले की, आम्ही नवीन अभिनेता आणू, पण जर तू गरोदर असशील, तर ते स्क्रीनवर चांगले दिसणार नाही. हा एक फॅमिली शो आहे, जर दुसरा सरदार आला आणि लोकांनी तुला प्रेग्नंट पाहिलं तर त्यांना वाटेल की, तू दुसर्‍यापासून गरोदर आहेस. मी त्यांना सांगितलं की माझा क्लोजअप घ्या आणि कोणाला कळणार नाही, पण त्यांना काहीच जुळवून घ्यायचं नव्हतं.’

Whats_app_banner