TMKOC: काय! आत्माराम भिडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडणार? अभिनेत्याने स्वत: चाहत्यांना सांगितले!-taarak mehta ka ooltah chashmah bhide fame actor mandar chandwadkar leaving show know the truth ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: काय! आत्माराम भिडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडणार? अभिनेत्याने स्वत: चाहत्यांना सांगितले!

TMKOC: काय! आत्माराम भिडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडणार? अभिनेत्याने स्वत: चाहत्यांना सांगितले!

Aug 28, 2024 09:35 AM IST

TMKOC Fame Bhide: ‘तारक मेहता…’मधील आत्माराम भिडे हे हा शो सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता खुद्द अभिनेत्यानेच यावर भाष्य केलं आहे.

आत्माराम भिड़े
आत्माराम भिड़े

TMKOC Fame Bhide Leaving Show: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. २००८ पासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या १५ वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेची प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडते. मात्र, गेल्या काही काळात अनेक पात्रांनी ही मालिका सोडली आहे. तर, अनेकदा काही कलाकारांविषयी सोशल मीडियावर अफवाही येतात. आता मालिकेतील आत्माराम भिडे हा शो सोडणार असल्याची बातमी समोर आली आहे. या अफवांचे सत्य खुद्द भिडे मास्तरांनी स्पष्ट केले आहे.

खरंच भिडे शो सोडणार?

यूट्यूबवर आत्माराम भिडेची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडकरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिनेत्याचा हात जोडतानाचा एक फोटो आहे. त्यावर लिहिले आहे की, तो निर्मात्यांना एक्सपोज करत आहेत आणि त्याने हा शो सोडला आहे. या व्हिडिओनंतर मंदारने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाला मंदार चांदवडकर?

मंदार चांदवडकर याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ सेलिब्रेशनसाठी नाही, तर मला काहीतरी शेअर करायचे आहे. हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला असेल, ज्यावर थंबनेल आहे की, ‘गोली को निकाला गया, आज तारक मेहता का उल्टा चश्मा का पूरा सच बोलूंगा, दया भाभी नहीं आएंगी, मैं भी शो छोड़कर जाउंगा.’ मलाही तो व्हिडिओ पाहण्यात रस होता. पण, हे लोक सोशल मीडियाचा कसा गैरवापर करत आहेत, हे पाहून खूप दु:ख होते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेली छायाचित्रे ही माझी लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यानची आहेत, जी मी मालिकेला १६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केली होती. या सर्व अफवा आहेत.’

हा व्हिडिओ पोस्ट करत मंदारने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका... आणि प्लीज पसरवू नका... तारक मेहता का उल्टा चष्मा २००८ पासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि आगामी काळातही असेच करत राहील. मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं होतं, म्हणून मी ही रील पोस्ट केली आहे.’ गेल्या काही काळापासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेविषयी अनेक चर्चा सुरू आहेत. या मालिकेविषयी अनेक अफवांना उधाण आले आहे.