Asit Modi Reaction On Palak Sidhwani : सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, अनेकदा या शोशी संबंधित काही ना काही वाद चर्चेत येत असतात. गेल्या वर्षी शोमध्ये सोनूची भूमिका साकारणारी पलक सिधवानीने निर्माते आणि असित मोदी यांच्यावर तिचा मानसिक छळ केल्याचा आणि पैसे न दिल्याचा आरोप केला होता. तर, पलक सिधवानीनेही शोचा निरोप घेतला. आता या आरोपांवर मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी भाष्य केलं आहे. त्याने सांगितले की, पलक सिधवानी सेटवर अजिबात शिस्त बाळगत नव्हती.
'न्यूज १८'शी खास बातचीत करताना असित मोदी यांनी पलक सिधवानीला शो का सोडावा लागला हे स्पष्ट केले. असित मोदी म्हणाले की, 'पलकने विनाकारण गोंधळ घातला. सेटवर पलक शिस्तबद्ध नव्हती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रत्येकाने शिस्तीने काम केले पाहिजे. मी सब टीव्हीसाठीही कार्यक्रम बनवत आहे. मीही सन्मानाने काम करतो. त्यांच्याशी माझा करार आहे. त्याचप्रमाणे कलाकाराचा माझ्याशी करार आहे. दर महिन्याला २६ भागांची निर्मिती करावी लागते. त्यासाठी शिस्त असायला हवी. हे आपल्या मनःस्थितीवर अवलंबून असू शकत नाही. प्रत्येकजण काम करत आहे. हे एक कारण आहे.'
कराराचा भंग अमान्य असून तुमच्या पात्रामुळे लोक तुम्हाला ओळखतात, असेही असित मोदी म्हणाले. ‘मग, ती पलक असो किंवा आणखी कोणी. अब्दुलचे खरे नाव शरद आहे, पण लोक त्याला अब्दुल भाई म्हणतात. कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखांनी ओळखले जाते. प्रत्येकाची व्यक्तिरेखा सकारात्मक आहे. गोंडस व्यक्तिरेखा आहे. आता कुणी जाऊन एखाद्या गोष्टीचं प्रमोशन केलं तर त्याचा परिणाम आपल्या शोच्या प्रतिमेवर होतो. प्रत्येकजण कंत्राटी पद्धतीने काम करतो. मलाही मर्यादेत राहून काम करावं लागतं. तुम्ही करार मोडू शकत नाही’, असे पलक म्हणाली.
पलक सिधवानीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे का, असे विचारले असता असित मोदी यांनी होकारार्थी उत्तर दिले. ‘आम्ही तिला कंत्राटी पद्धतीने काम करण्यास सांगितलं. आम्ही कशालाही नाही म्हणत नाही, पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला विचारावे लागेल. तुम्ही काहीही करायचं ठरवाल, ते असं चालू शकत नाही. आम्ही तिला नोटीस पाठवली. आम्ही तिला कोर्टात खेचलं नाही. आमच्या वकिलाने तिला सर्व काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिला समजले नाही. त्यामुळे गदारोळ झाला.’